मुंबई वगळता अन्य पालिकांकडे गुगल मॅपसंदर्भातल यंत्रणा नसल्याने मुदतवाढ?

मुंबई : मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचा मसुदा २९ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२५ या अंतिम प्रभाग पुनर्रचनेचा प्रस्ताव प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. पण आता त्यात बदल करून ही तारीख ३ ते ०६ ऑक्टोबर करण्यात आली आहे. मात्र, ही मुदत केवळ इतर महापालिकांमध्ये गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्याने त्यासाठी वेळ वाढवण्यात देण्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने सोमवारपर्यंत स्थळ पाहणीपर्यंतची कामे पूर्ण केली असल्याची माहिती मिळत आहे.


राज्यातील सर्व वर्गातही महापालिका, नगरपालिका तसेच मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रभाग पुनर्रचना बाबत राज्याच्या नगरविकास खात्याच्या वतीने परिपत्रक जारी केले आहेत. यात प्रभाग पुनर्रचना बाबतचा कार्यक्रम जारी १२ जून रोजी प्रसिध्द करण्यात आल्यानंतर २३ जून रोजी सुधारीत कार्यक्रम जाहीर
करण्यात आला.



त्यानुसार, प्रगणक गटांची मांडणी ११ जूनपासून करून स्थळ पाहणीच्या काम १९जून ते ०४ जुलै या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर गुपग मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्यासाठी ०५ ते १० जुलै २०२५ची मुदत देण्यात आली आहे. मात्र, याच गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्याचे सॉफ्टवेअर नसल्याने हा कार्यक्रम वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे.


मुंबई महापालिकेने दोन महिन्यांपूर्वीच हे सॉफ्टवेअर घेतल्यामुळे पूर्वीच्या नियोजित कार्यक्रमानुसार प्रभाग रचना करण्यास प्रशासन सक्षम असले तरी इतर महापालिकेकडे ही यंत्रणा नसल्याने मुदतवाढ देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुधारीत कार्यक्रमानुसार सर्वच महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा निर्णय असून त्याचदृष्टीकोनातून प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे तसे झाल्यास नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध

Kurla Landslide : कुर्ल्यातील भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - सचिन अहिर

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या

CJP Protest : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

- राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या मुदतीत वाढ मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक