Foxconn India Breaking - मोठी बातमी! तैवान सरकारकडून भारतात अब्जो डॉलर्स गुंतवणूकीसाठी फॉक्सकॉनला अंतिमतः परवानगी!

प्रतिनिधी: भारतीयांसाठी एक महत्वाची घडामोड घडत आहे. भारतीय अर्थविश्वात अत्यंत आश्वासक असे चित्र निर्माण झाले असतानाच भारतीय इकोसिस्टिममध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तैवान (Taiwan) स्थित कंपनी इलेक्ट्रॉनिक फॉक्सकॉन कंपनीच्या भारतीय गुंतवणूकीला तैवान सरकारने मंजूर करत त्यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे ही फॉक्सकॉनची आतापर्यंत मोठ्या मानल्या जाणाऱ्या गुंतवणूकीपैकी एक असेल. जागतिक वृत्तसेवेचा माहितीनुसार ही गुंतवणूक २.२ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत भारतीय बाजारात असणार आहे.


तैवान सरकारने भारतीय व अमेरिकन बाजारातील गुंतवणूकीला ही मंजूरी दिली. तैवानच्या अर्थमंत्रालयाने ही मंजूरी दिल्याने आपल्या देशात परकीय गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. युझहान टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीत चीनकडून गुंतवणूक केली जाईल. ही तैवानची कंपनी युझहान (Yuzhan Technology India Private Limited) कंपनीत गुंतवणूक करेल जी फॉक्सकॉनची भारतीय उपकंपनी (Subsidiary) आहे. फॉक्सकॉनकडून अमेरिकेत नव्या प्रकल्प बांधणीसाठी ७३५ दशलक्ष डॉलर्सचा गुंतवणूकही मान्य केली गेली आहे. या कंपनीचे नाव प्रोजेक्ट ईटीए (Project ETA) असणार आहे. तज्ञांच्या मते, फॉक्सकॉनकडून ही विशेष राजकीय आर्थिक रणनीती असू शकते. कारण अमेरिका व चीनच्या यांच्यातील व्यापारातील द्वंद्वाचा फटका बसू नये म्हणून चीनच्या बाहेर कंपनी आपला व्यवसाय वृद्धिंगत (Expansion)करण्यासाठी प्रयत्न करू शकते.


त्यामुळेच भारत हा कंपनीसाठी मोठे बाजार व्यासपीठ असू शकते. सध्या भारतासह कंपनी आपला विस्तार युएस, मेक्सिको, विएतनाम, युरोप खंड इत्यादी ठिकाणी करू इच्छिते असे सांगण्यात येत आहे. सध्या कंपनीचे २२३ कारखाने, व २४ कार्यालय यांचा पसारा जगभर आहे. तैवान सरकारने फॉक्सकॉनसह इतर कंपनीच्या परदेशी गुंतवणूकीला ही मान्यता दिली. या नव्या गुंतवणूकीमुळे भारतातील आयफोन व त्यांच्या साहित्यातील (Accesories and Components)  उत्पादनात (Manufacturing) यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे.


फॉक्सकॉन व्यतिरिक्त, इतर कंपन्यांनाही गुंतवणूक मंजुरी मिळाली. कॅथे फायनान्शियल होल्डिंगचा भाग असलेल्या कॅथे युनायटेड बँकेला व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी येथील त्यांच्या शाखेत १६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली. हे पैसे तेथील त्यांच्या कर्ज व्यवसायाला पाठिंबा देतील.


याव्यतिरिक्त, एयूओ कॉर्पचा भाग असलेल्या एयूओ मोबिलिटी सोल्यूशन कॉर्पला चीनमधील त्यांच्या झियामेन शाखेत २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही शाखा वाहनांसाठी डिस्प्ले पार्ट्स आणि इतर घटक बनवते.


अखेर, हाँगकाँगस्थित रॉयल सील होल्डिंग कंपनीला त्यांच्या तैवान शाखेत सुमारे ३.२९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली. ही शाखा कर्करोगाच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करते. कोवेल्थ मेडिकल होल्डिंग कंपनी ही तैवानची कंपनी रॉयल सीलमध्ये एक प्रमुख भागधारक आहे.

Comments
Add Comment

Stock Market Closing: शेअर बाजारात अखेरच्या निफ्टी एक्सपायरीत अखेरच्या सत्रात रिकव्हरी मात्र किरकोळ घसरण कायम

मोहित सोमण:अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०.४६ अंकाने घसरत ८४६७५.०८

एनएसईकडून गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाची सूचना- भामट्यांची माहिती वाचा नावासकट!

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने गुंतवणूकदारांना काही अपंजीकृत व्यक्ती (Unregistered) आणि

 मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार  

अजुनही वेळ गेलेली नाही, भाजपने आपल्या कोटयातील १२  जागांवर माघार घेवून रिपब्लिकन कार्यकर्त्यांना संधी द्यावी

Nifty Rejig: निफ्टी निर्देशांकात फेरबदलाची तारीख नव्या स्क्रिपचा समावेश झाल्याने बाजारात मोठ्या उलाढाली सुरु 'ही' आहे माहिती

मोहित सोमण:आज डिसेंबर निफ्टी समायोजनाचा (Nifty Adjustment) अथवा निफ्टी रिज (Nifty Rejig) दिवस असल्याने आज निफ्टी निर्देशांकात

Stock Market Investors Returns: अंतर्बाह्य संकटांना तोंड दिल्यानंतरही गुंतवणूकदारांची यावर्षी ३० लाख कोटींची कमाई

मोहित सोमण: मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकदारांनी केलेली विक्री, युएससह टॅरिफबाबत असलेली अनिश्चितता, रूपयाचे

जीडीपीनंतर आता ग्राहक किंमत महागाई निर्देशांक मोजण्याच्या पद्धत बदल होणार! सरकारने महागाईवर केले मोठे विधान

मुंबई: सरकारने ग्राहक महागाई किंमतीचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या पद्धतीत बदल करण्याचे ठरवले आहे.