सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईचा अहवाल सादर करा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून शुक्रवारी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार संताप व्यक्त केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. "सभागृहाचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही," अशा कडक शब्दांत समज देत, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली याचा 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' (एटीआर) येत्या सोमवारी सकाळी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरू असताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दालनात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. यावरून सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले. सभागृहातील गोंधळ आणि सदस्यांच्या भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशासनाने गांभीर्य राखणे बंधनकारक आहे. "संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याचा सविस्तर अहवाल सोमवारी (१६ मार्च) कार्यालयीन कामकाज सुरू होताच माझ्या दालनात सादर करावा," असे आदेश त्यांनी सरकारला दिले.


 

 

 
Comments
Add Comment

Jalgaon Crime News : खाकीचा माज ? महिला व तिच्या मुलीला मारहाण, पोलीस शिपाई अखेर अटकेत

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथे महिला

Pune Accident : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात बसमधून खाली पडल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; 'त्या' एका चुकीमुळे गेला जीव?

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या पीएमपीएमएल बसमधून अचानक तोल जाऊन खाली

Nashik Rain Update : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ? नाशिकसह जळगाव, धुळे जिल्ह्यांत आज पावसाची स्थिती काय ?

Nashik Rain Update : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे

Chhatrapati Sambhaji : देवा...किती किळसवाणा प्रकार! पप्पांनी कचोरी आणली अन् त्यात उंदराच्या लेंड्या; ५ पैकी २ कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याने नागरिकांत संताप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर शहरात (Vaijapur Area) अन्नाची अवहेलना आणि ग्राहकांच्या

Nalasopara Viral Video : नालासोपाऱ्यात हॉटेलच्या भातावर उंदरांचा हैदोस; ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी

नालासोपारा : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Mahanagpalika) क्षेत्रातील नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातून एक अत्यंत

Nashik Crime : नाशिकमध्ये चाललंय काय ? रविवार कारंजावर टवाळखोरांचा धुमाकूळ, रिक्षाचालकाला अडवून थेट...

Nashik Crime : नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असं नाशिक पोलीस गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून वदवून घेत असले