Dycm Eknath Shinde: कोल्हापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला 'जबर' धक्का

  91

कोल्हापूर मनपातील २५ माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश


कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेतील २५ माजी नगरसेवक आणि काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात कोल्हापूर मनपामधील तीन माजी महापौरां चाही समावेश आहे. या सर्वांचे शिंदेंनी पक्षात स्वागत करून आगामी मनपा निवडणुकांच्या रणांगणात पक्षाच्या वतीने शड्डू ठोकला आहे. यामुळे शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात आपल्या पक्षविस्तार सुरू केला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.


काल उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी कोल्हापूर मनपाचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईक नवरे, माजी महापौर सुनील कदम, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी स्थायी समिती सभापती संभाजी जाधव, माजी सभापती अभिजित चव्हाण, माजी शिक्षण समिती सभापती रशीद बारगीर, माजी नगरसेविका रीना कांबळे,पूजा नाईकनवरे, अश्विनी बारामते, गीता गुरव, अनुराधा खेडेकर अर्चना राजू पागर, सीमा कदम, कविता माने, सुनंदा मोहिते, संगीता सावंत, प्रकाश नाईकनवरे, जहांगीर पंडत, भरत लोखंडे, आनंद खेडकर, इस्माईक बागवान आणि त्यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यासोबत काँग्रेस पक्षातील अभिजित खतकर, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण पाटील, जिल्हा सचिव कुलदीप सावरतकर, संजय सावंत,पार्थ मुंडे, अशोक इंगळे, सुजल चव्हाण यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.


पक्षप्रवेशाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की,'कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे प्रमुख नगरसेवक आज शिवसेनेमध्ये आले आहेत ही आनंदाची बाब आहे.विधानसभा निवडणुकीत याच कोल्हापूरातून आम्ही महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता . आणि पाच आमदारांच्या रूपाने येथील जनतेने आम्हाला भरभरून मतांचे दान दिले. गेल्या अडीच वर्षात विविध विकासकामांसाठी आम्ही ४ हजार २०० कोटी रुपयांचा निधी या शहराला दिला. त्यातून शहरात अनेक विकासकामे घडली.पुराच्या काळात मी कोल्हापूरात मदतीसाठी आलो होतो मात्र आपल्याला आता या शहराला पुराच्या विळख्यातून कायमचे सोडवायचे आहे.आता पुन्हा एकदा कोल्हापूरचा विकास करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन पालिकेवर भगवा फडकवायचा असून त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहनही यावेळी शिंदे यांनी आपल्या शिवसैनिकांना केले आहे.


यावेळी आरोग्य आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार किशोर अप्पा पाटील, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख उदय सावंत, आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


पाचोरा विधानसभेतील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश


यासोबतच पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पुढाकाराने अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात बंडू माने, सचिन मिस्त्री, अमोल मिस्त्री, किशोर सुतार, दंगल भोई, राकेश सुतार, शाळीग्राम सुतार, प्रवीण सुतार आणि त्यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना