अ‍ॅक्सिओम-४ मिशनने पृथ्वीची कक्षा ओलांडली

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला, पोलिश अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की, हंगेरियन अंतराळवीर टिबोर कापू आणि अमेरिकेचा अंतराळवीर पेगी व्हिटसन हे चौघे नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन C213 अंतराळयानाद्वारे दुपारी बारा वाजून एक मिनिटाने C213 अंतराळयानाद्वारे २८ तासांच्या प्रवासाला रवाना झाले. यान २८ तासांचा प्रवास करुन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल. तिथे पोहोचताच यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले जाईल. ही डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यानातील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश करतील.

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अ‍ॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.

पृथ्वीची कक्षा ओलांडली

अंतराळयानाने ७००० किलोमीटर वेगाने पृथ्वीची कक्षा ओलांडली. आता यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे.

ऐतिहासिक महत्त्व

केनेडी स्पेस सेंटरमधील लाँच पॅड ३९ हे नासाच्या सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक प्रक्षेपण स्थळांपैकी एक आहे. याच ठिकाणाहून नील आर्मस्ट्राँग आणि त्यांचे साथीदार १९६९ मध्ये चंद्रावर गेले होते. आता याच प्रक्षेपण स्थळावरुन अ‍ॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण झाले आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात करणार ६० प्रयोग

अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेला घेऊन जाणारे ड्रॅगन अंतराळयान गुरुवार, २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहे. अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर १४ दिवसांत ६० प्रयोग करणार आहे. प्रयोगांद्वारे वैज्ञानिक संशोधन केले जाणार आहे. पृथ्वीपासून कमी अंतरावरील कक्षेतले गुरुत्वाकर्षण या विषयाशी संबंधित संशोधन प्रामुख्याने केले जाणार आहे.

  1. शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर असतील. तसेच ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर असतील.

  2. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) प्रकल्पातील अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की हे १९७८ नंतर अंतराळात जाणारे दुसरे पोलिश अंतराळवीर असतील.

  3. टिबोर कापू हे १९८० नंतर अंतराळात जाणारे दुसरे हंगेरियन अंतराळवीर असतील.

  4. पेगी व्हिटसन तिच्या दुसऱ्या व्यावसायिक मानवी अंतराळ मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. अमेरिकन अंतराळवीराने अंतराळात घालवलेला सर्वाधिक काळ हा तिचा सध्याचा विक्रम आहे.

Comments
Add Comment

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

नवी दिल्ली : दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असलेले डॉ. उमर मोहम्मद आणि त्यांचे साथीदार

दिल्लीतील महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज, महिला घाबरली आणि पोलिसांना दिली माहिती

दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिपालपूर परिसरात स्फोटासारखा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती

दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : हल्ल्याचे संपूर्ण ब्लूप्रिंट आले समोर !

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक