प्रेक्षक म्हणतात झी मराठीवर जुने दिवस नव्याने येणार ....तेजश्री प्रधानच सिनेसृष्टीतील बड्या अभिनेत्यासोबत पुनरागमन

  89

     सध्या झी मराठीवर एका ट्रेलर ने धुमाकूळ घातला आहे आणि तो ट्रेलर म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची नवीन मालिका 'वीण दोघांतली तुटेना'. काही दिवसांपूर्वी सुबोध भावे या अभिनेत्याने 'होणार सून ती ह्या घरची' तर तेजश्री प्रधानने 'तुला पाहते रे' असं सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती.झी मराठीवर आता काही नवी मालिका येणार आणि त्यात आपले दोन्ही आवडते कलाकार दिसणार यामुळे प्रेक्षकांना भलताच आनंद झाला होता. सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात होता. खूप दिवसांनी आपल्या आवडत्या कलाकारांना छोट्या पडद्यावर रोज पाहायला मिळणार म्हणून प्रेक्षक भलतेच खुश झाल्याच दिसत होत.



मालिकेच्या प्रोमो विषयी सांगायचं झाल्यास यात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एका कॅफे मध्ये बसले आहे. त्यांची नाव अनुक्रमे समर आणि स्वानंदी अशी आहेत. यामध्ये सुबोध भावे एका जेंटलमनच्या पोशाखात सुटाबुटात असून त्याच वागणं अतिशय शिष्ट आहे आणि समोर असणारी तेजश्री प्रधान एक जबाबदार स्त्रीच्या भूमिकेत दिसते. या प्रोमो मध्ये दोघंही एकमेकांसोबत त्यांच्या लग्नाची बोलणी करायला येतात परंतु समरने सगळ आधीच ठरवल आहे हे जेव्हा स्वानंदीच्या लक्षात येत तेव्हा ती  तिथून उठते आणि बाहेरच्या दिशेने निघते. तेव्हा समर तिला थांबवतो.आपल्या लग्नाबद्दल आपण काही बोललोच नाही अस म्हणतो.परंतु त्यावर स्वानंदी आपल्या लग्नाबद्दल काय बोलायच ते तर ठरलेलंच आहे अस म्हणत तथून निघून जाते. त्यानंतर दोघंही लग्न मंडपात एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांना अंगठ्या घालतात.परंतु अंगठी  घालण्याआधी स्वानंदी समरला हे लग्न ती  तिच्या भावसाठी करते अस म्हणते; तर समर स्वानंदीला उद्देशून हे लग्न तो त्याच्या बहिणीसाठी करतो अस म्हणतो त्यानंतर मालिकेच नाव एका विशिष्ट  लयीत वाजत. ते ऐकून आपल्याला झी मराठीच्या एक मालिकेची आठवण होते कारण 'खुलता कळी खुलेना' या मालिकेच्या टायटल ट्रॅक मधली ही ओळ आहे. नियतीने जोडी जमवली की ठरवून लग्न होत आणि न जुळवता प्रेम या मालिकेच्या टॅगलाईनवर हा प्रोमो संपतो.


 या मालिकेविषयी अनेक प्रतिक्रिया आता प्रेक्षकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत. त्यामध्ये काहीजण ही मालिका म्हणजे 'बडे अच्छे लगते है'  या हिंदी  मालिकेचा रिमेक आहे असा अंदाज वर्तवत आहेत. यापूर्वी तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे या कलाकार जोडीला आपण 'Hashtag तदैव लग्नम्' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहिल होत. आता ही जोडी पुनः एक नव्या प्रेमकहाणी सोबत सोशल मिडियावर प्रसिद्ध ठरणार का याकडे प्रेक्षकांच लक्ष लागून राहील आहे.


Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा