अंतराळात झेपावण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी पत्नीसाठी लिहिला भावनिक संदेश

कोण आहे शुभांशू शुक्ला यांच्या पत्नी?  


नवी दिल्ली: लखनऊ येथील भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) आणि इतर तीन अंतराळवीर अ‍ॅक्सिओम-४ (Axiom-4 mission) द्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी; फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथील लाँच कॉम्प्लेक्स ३९ए येथून प्रक्षेपित झाले. मूळतः २२ जून रोजी प्रक्षेपित होणारे हे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आले होते. जे आज पहाटे २:३१ वाजता (दुपारी १२ वाजता) EDT (भारतीय वेळेनुसार) अंतराळात झेपावले. तत्पूर्वी शुभांशू शुक्ला यांनी पत्नी कामना यांचे आभार मानण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.


"२५ जून रोजी सकाळी आम्ही पृथ्वीवरून अंतराळात जाण्याची योजना आखत असताना, या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व लोकांच्या पाठिंब्याबद्दल आणि घरच्या लोकांचे आशीर्वाद व प्रेमाबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो," असे त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले. तसेच त्यांनी आपल्या पत्नीला टॅग करत तिचे विशेष आभार मानले. त्यांनी लिहिले, "कामना, तू एक अद्भुत जोडीदार आहेस, तुझ्याशिवाय हे काहीही शक्य नव्हते, त्यामुळे तुझे खूप खूप आभार" यासोबतच त्यांनी आपल्या पत्नीचा एक पाठमोरा फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते काचेच्या भिंतीवरून एकमेकांना निरोप देताना दिसत आहेत.





ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये शुभांशू शुक्ला यांच्या पत्नीविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे, त्यांनी कुठे शिक्षण घेतलं? ते अंतराळवीर कसे बनले? यापासून ते त्यांच्या आईवडिलांपर्यंत सर्व काही माहिती आहे. पण त्यांच्या पत्नीबद्दल अद्याप कुणालाच काही माहीत नव्हते,  त्यामुळे आज शुभांशू शुक्ला यांच्या पत्नी कोण आहेत? त्यांची ओळख कशी झाली याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया.



मैत्रीपासून जोडीदारापर्यंत 


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार , एअर फोर्स ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची पहिली पत्नी कामना हिच्यासोबत पहिली भेट लखनऊमधील प्राथमिक शाळेत झाली. ही दोघं बालपणापासून मित्र मैत्रिणी आहेत. "आम्ही तिसरीच्या वर्गापासून एकत्र शिकलो आहोत. आम्ही चांगले मित्र होतो. मी त्याला गुंजन म्हणून ओळखते, शुभांशू हा लहानपणापासूनच प्रचंड लाजाळू मुलगा राहिला, जो आता इतक्या लोकांना प्रेरणा देत आहे," असे कामना शुक्ला म्हणाल्या.



काय करतात शुभांशु यांच्या पत्नी?


शुभांशु शुक्ला यांनी ७  वर्षांपूर्वी लखनऊमध्येच कामना शुक्लाशी लग्न केलं. कामना या डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. शुभांशु आणि कामना यांचा एक ६ वर्षांचा मुलगा आहे. त्याचे नाव सिड आहे. त्या नेहमीच शुभांशु यांना पाठिंबा देत असतात. स्वतः शुभांशू शुक्ला यांची आई आशा शुक्ला देखील आपल्या सुनेचे कौतुक करताना थकत नाही.



शुभांशू शुक्ला यांच्या आईने केले सुनेचे कौतुक


शुभांशू शुक्ला यांची आई आशा शुक्ला यांनी अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेपूर्वी आपल्या सुनेकडून, मुलाला मिळालेल्या अढळ पाठिंब्याबद्दल कोडकौतुक केले. तिच्याशिवाय हे यश शक्य झाले नसते यावर वाक्यावर त्यांनी जोर दिला. "आमच्यासाठी आणि इतर सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सर्वत्र पोस्टर्स लावले जात आहेत. या देशातील एक माणूस, उंच भरारी घेणार आहे याचा सर्वांनाच आनंद आहे. आम्ही आमच्या सर्व शुभेच्छा आणि आशीर्वाद त्याला पाठवत आहोत. त्याला आमच्या सुनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तिच्याशिवाय हे शक्यच झाले नसते. तिने येथे सर्वात मोठी भूमिका बजावली आहे," असे शुभांशू शुक्ला यांच्या आईने सुनेविषयी बोलताना स्पष्ट केले.



Comments
Add Comment

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

नवी दिल्ली : दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असलेले डॉ. उमर मोहम्मद आणि त्यांचे साथीदार

दिल्लीतील महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज, महिला घाबरली आणि पोलिसांना दिली माहिती

दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिपालपूर परिसरात स्फोटासारखा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती

दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा : हल्ल्याचे संपूर्ण ब्लूप्रिंट आले समोर !

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक