मनात धाकधूक, टाळ्या अन् मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना... प्रक्षेपणाच्या वेळी भावूक झाली शुभांशू शुक्लाची आई

नवी दिल्ली: शुभांशू शुक्ला अ‍ॅक्सिओम मिशन-४ अंतर्गत आज, दि. २५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) रवाना झाले आहेत. शुभांशू ड्रॅगन कॅप्सूलसह तीन क्रू सदस्यांसह अंतराळात रवाना झाला आहे. आज झालेल्या या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण आहे, खास करून  त्यांच्या आईवडीलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू खूप काही सांगून गेले. 



शुभांशू यांचे पालक झाले भावनिक


प्रक्षेपणाच्या वेळी आपल्या लेकाला अंतराळासाठी उड्डाण करताना पाहून, शुभांशूचे पालक भावनिक झाले. आईने ओल्या डोळ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या मुलाला प्रोत्साहन दिले. तर वडिलांचा ऊर देखील अभिमानाने भरून आलेला दिसला. शुभांशू शुक्ला यांच्या आईने भावना व्यक्त करताना सांगितल्या की, "संपूर्ण देशाला शुभांशूचा अभिमान आहे". तर शुभांशूचे वडील शंभू दयाल म्हणाले की,  "माझ्या मुलाची कामगिरी ही केवळ लखनऊसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शुभांशूचे मिशन सुरू होताना पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. आमचे आशीर्वाद त्याच्यासोबत कायम आहेत आणि आम्ही देवाला प्रार्थना करतो की त्याचे मिशन चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावे."



राकेश शर्मानंतर अंतराळात पाऊल ठेवणारे दुसरे भारतीय


मूळचे लखनऊचे रहिवासी असलेले भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे राकेश शर्मानंतर अंतराळात पाऊल ठेवणारे दुसरे भारतीय बनणार आहेत. या अभिमानाच्या क्षणी त्यांच्या कुटुंबात तसेच संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे.



आशा शुक्ला यांनी व्यक्त केल्या भावना 


प्रक्षेपणापूर्वी, शुभांशूची आई आशा शुक्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणाल्या "आमच्यासाठी, तो अजूनही लहान आहे, तो आजही तसाच आहे जो बालपणात होता. मी काल संध्याकाळीच शुभांशूशी बोलले. त्यावेळी तो मला म्हणाला आई, मी ठीक आहे, मी मजा करत आहे, मी अंतराळात जाण्यासाठी खूप उत्सुक आहे."



शुभांशू शुक्लाने अवकाशातून पहिला संदेश पाठवला



अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेच्या प्रक्षेपणानंतर, शुभांशू शुक्लाने अवकाशातून पहिला संदेश पाठवला आहे. ते म्हणाले की ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत आणि ही एक अद्भुत सवारी होती. सध्या आपण पृथ्वीभोवती ७.५ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या