रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी करतात काय?

महाड येथील आंबेत-टोळ पुलांचे भवितव्य धोक्यात, लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष


महाड : रायगड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या प्रयत्नाने रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हयांना जोडणारे बांधलेले आंबेत व टोळ पुल आज गंभीर संकटात सापडले आहेत. ४७ वर्षे जुने झालेले हे पुल पूर्णपणे कालबाह्य झालेले असूनही नवीन बांधकामाऐवजी केवळ तात्पुरत्या दुरुस्तीवर करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे.



सावित्री पूल दुर्घटनेचा धडा विसरला?


२०१६ मध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळून ३५ जणांनी जीव गमावला होता. या दुर्घटनेनंतर राज्यभरातील धोकादायक पुलांचे अंडरवॉटर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ९ वर्षांनंतरही या सर्वेक्षणाच्या अहवालाचे काय झाले हे गुलदस्त्यातच आहे.



आंबेत पुलाची धोकादायक स्थिती


२०१९ मध्ये वाळू वाहतुकीच्या बार्जने आंबेत पुलाच्या खांबाला दिलेल्या धडकीमुळे पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक झाली होती. दोन वर्षांनी करोडो रुपयांच्या खर्चाने दोन वेळा केलेल्या दुरुस्तीनंतर २०२१ मध्ये हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.



निधी मंजुरीचा गोंधळ


टोळ व दादली पुलालाही ४० वर्षाहून अधिक कार्यकाळ झाला आहे. केवळ दादली पुलाच्या नव्या कामाला मान्यता मिळाली असली तरी आंबेत व टोळ पुलांसाठी निधी मंजूर झालेला नाही. करोडो रुपयांचा हा खर्च राज्य सरकार करणार की केंद्र सरकार, हा प्रश्न कायम आहे.



लोकप्रतिनिधींची उदासीनता


रत्नागिरी व रायगड या दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या मुद्द्यावर उदासीन असल्याचे दिसून येत आहे. नवीन पूल बांधकामाला किमान तीन वर्षे लागण्याची शक्यता असताना मंजुरीला किती काळ लागेल हा देखील अनुत्तरित प्रश्न आहे.



नागरिकांना 'तारेवरची कसरत'


लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतरच राज्य सरकार निधी देते की केंद्राकडे बोट दाखवते, या गोंधळामुळे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे.


कोकणातील या महत्त्वाच्या पुलांच्या भविष्याबाबत तत्काळ निर्णय घेणे गरजेचे असून लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस

मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा

भटक्या कुत्र्यांची दहशत; महिलेवर जीवघेणा हल्ला, ज्येष्ठ नागरिकाला आणि चार मुलांना केले जखमी

बंगळुरू : कर्नाटकमधील होन्नाली तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. तुमकुरु जिल्ह्यात गुब्बी

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' जाहिराती मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने दिल्या, रोहित पवारांचा दावा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ठिकठिकाणी पोस्टर

आमदार गोपीचंद पडळकरांनी मनोज जरांगेंना धमकावले

पुणे : धनगर समाजाबाबत मनोज जरांगे यांनी वापरलेल्या अपशब्दांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र निषेध केला.

मंगळवारपासून सुरू होणार आशिया चषक क्रिकेट स्पर्धा, कधी होणार भारताचा पहिला सामना ?

अबुधाबी : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धा मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन