Stock Market Update: ट्रम्प यांच्या Ceasfire नंतर बाजारात उसळीचे रॉकेट! सेन्सेक्स ८७८.४९ व निफ्टी २७१.५० अंकांने उसळला!

प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात सुगीचा काळ सुरु झालेला आहे. अमेरिकन बाजारातील झालेल्या चांगल्या वाढीनंतर पुन्हा भल्या सकाळी गिफ्ट निफ्टीत २२९ अंकांने वाढ झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात त्याचा फायदा होत आहे. सकाळी सत्र सुरू होतानाच शेअर बाजारात उसळी आली आहे. सेन्सेक्स (Sensex) ८७८.४९ अंकाने उसळून ८२७६२.६९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांक २७१.५० अंकाने वाढल्या नंतर २५२४३.४० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ७१५.२० अंकांची मोठी उसळी घेतल्यानंतर ६३८८८.५३ पातळीवर गेला आहे तर बँक निफ्टी ६४३.६० अंकाने उसळलानंतर ५६७०२.९५ पातळीवर पोहोचला आहे.


सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७८ व ०.८५% वाढ झाली आहे. तर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६८ व ०.५८% वाढ झाली आहे. आज दोन्ही बँक निर्देशांकांत व मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीने बाजा रात मोठी रॅली झाली आहे.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये काल वाढलेला मिडिया (०.१८%) समभाग वगळता इतर समभागात समाधानकारक वाढ झाली आहे. बँक निफ्टीत वाढल्यानंतर पीएसयु बँक (१.८८%), खाजगी बँक (१.०५%), फायनांशियल सर्विसेस (१.१२%), मेटल (०.७२%), आयटी (०.८४%), रिअल्टी (०.९७%),ऑटो (१.३८%), मिडस्मॉलकॅप फायनांशियल सर्विसेस (०.७३%) समभागात वाढ झाली आहे. आज विशेषतः क्षेत्रीय विशेष मजबूत कामगिरीनंतर बाजारात सपोर्ट लेवल प्राप्त झाल्याने बँक निर्देशांकाने आपल्या होत असलेल्या नुकसानाची भरपाई म्हणून चांगली कामगिरी केली. विशेषतः इस्त्राईल व इराण यांच्यातील युद्धात अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे काल युएस बाजारात नुकसान झाले होते परिणामी भारतीय बाजारात पडझड झाली. मात्र युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात यावेळी वेळेपूर्वी कपात होईल अशी आशा निर्माण झाल्याने विशेषतः बँक निर्देशांकात मोठी वाढ होत आहे.


याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात कपात केल्यानंतर बाजारात तरलता (Liquidity) वाढत आहे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. आज तेलाच्या निर्देशांकात झालेली असताना मोठा 'रिव्हर्स 'फायदा बाजाराने घेतला आहे. इराण इस्त्राईल यांनी नुकत्याच केलेल्या Ceasfire मुळे बाजारात मोठी उपलब्धता निर्माण झाली व कच्चे तेल भारतीय बाजारात ४% घसरले आहे. सोने चांदीतही घसरण कायम राहिली आहे एकूणच बाजारातील स्थिती पाहता गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस आश्वासक वाटत आहे.


आज सकाळच्या सत्रात रतनिइंडिया (६.२५%), स्वान एनर्जी (५.६६%), हॅपी माईंड (४.८३%),अनंत राज (४.६१%), एचपीसीएल (४.३५%), जेएम फायनांशियल (४.२४%), अदानी पोर्टस (४.१३%), इंटरग्लोब एव्हिएशन (३.६२%), युको बँक (३.४९%), युनियन बँक (३.३५%) हिताची एनर्जी (३.२४%), वोडाफोन आयडिया (३.२१%),भारत पेट्रोलियम (३.७०%), मदर्सन (२.९७%), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (३.०१%), महिंद्रा अँड महिंद्रा (२.४४%), कॅनरा बँक (२.३९%), अल्ट्राटेक सिमेंट (२.२८%), बँक ऑफ बडोदा (१.९१%) जियो फायनांशियल सर्विसेस (१.९१%),श्रीराम फायनान्स (२.४३%) या समभागात वाढ झाली आहे.तर सर्वाधिक घसरण गार्डन रिच (५.५४%), बीईएमएल (५.२६%),ऑइल इंडिया (३.७ ७%),भारत डायनॅमिक (२.०९%), एनटीपीसी (२.०८%),एमसीएक्स (२.०४%),ओएनजीसी (२.१९%), न्यूजेसॉफ्टवेअर (२.०२%), हिन्दुस्तान एरोनॉटिक (१.९९%), माझगाव डॉक (१.७६%), डेटा पॅटर्न (१.७४%), झी एंटरटेनमेंट (१.०७ %) एव्हेन्यू सुपरमार्ट (०.६६%), ट्रेंट (०.३८%), हॅवेल्स इंडिया (०.३१%), सिमेन्स एनर्जी इंडिया (०.२२%) या समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या