S&P Global Report : भारताच्या जीडीपीत पुढील दोन वर्षांत वाढ होणार असल्याचे कंपनीचे भाकीत! 'या' कारणांमुळे ही वाढ अपेक्षित

प्रतिनिधी: एस अँड पी ग्लोबल (S& P Global)रेटिंग एजन्सीने भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) बाबत नवे भाकीत मांडले आहे.कंपनीने केलेल्या पुनः सर्वेक्षणानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.प्रामुख्याने घरगुती मागणीत उल्लेखनीय वाढ झाल्याने ही वाढ अपेक्षित असल्याचे एस अँड पी ग्लोबलने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.रिसर्च निरिक्षणात म्हटल्याप्रमाणे,कंपनी भारतीय अर्थ व्यवस्थेकडे बघताना,भारताचा यावर्षी जीडीपी ६.५% राहू शकतो असे म्हटले आहे.याशिवाय मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी जीडीपीत ०.२% वाढ होऊ शकते असेही त्यामध्ये म्हटले आहे.तसेच इयर ऑन इयर बेसिसवर (YoY)मध्ये ही वाढ आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ०.२% आणखी वाढून ६.७% राहू शकते असेही अहवालात म्हटले गेले.

याखेरीज अहवालात म्हटले आहे की,' भारतातील अन्नधान्यातील महागाईत घट होत असल्याने हेडलाईन्स इन्फ्लेशन (महागाई)पातळी राखणे शक्य झाले आहे.सामान्यतः या अहवालात भारतासोबतच दक्षिण आशियाई देशाचे भाकीत मांडले जाते ज्यामध्ये इंडोनेशिया मलेशिया देशांचाही समावेश आहे.मात्र अमेरिकेबरोबर घटत्या निर्यातीमुळे मात्र वस्तूंच्या किमती वाढू शकतात असाही इशारा अंदाजपत्रकात मांडला गेला आहे.निरिक्षणातील माहितीनुसार,यंदा मान्सून सामान्य पा तळीवर राहू शकतो व तेलाच्या किमतीत घसरण अपेक्षित असून आर्थिक बाबतीत सहज सरलता अपेक्षित आहे. आगामी काळात आयकरातही दिलासा मिळू शकतो अशी संभावनाही अहवालात व्यक्त केली गेली.

संपूर्ण आशिया पॅसिफिक खंडाचा विचार करता मागणीतही घट अपेक्षित आहे व ती मागणीही कमी लवचिक (Resilient)असू शकते असा निवाळा या अभ्यासात दिला गेला आहे.चीनच्या बाबतीत मात्र एस अँड पी ग्लोबलने काहीसा वेगळा अंदाज वर्तवला आहे.चीनच्या बाबतीत,आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीडीपी दर ४.३% व २०२६-२७ मध्ये हाच दर ४.०% राहू शकतो असे म्हटले आहे.

त्यात असेही म्हटले आहे की,भारत आणि फिलीपिन्ससारख्या वस्तूंच्या निर्यातीशी कमी संपर्क असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक मंदी मर्यादित करण्यासाठी देशांतर्गत मागणीची लवचिकता विशेषतः संबंधित आहे.याशिवाय जागतिक ऊर्जे च्या किमतींमध्ये अलीकडेच झालेली घसरण आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चलनातील वाढ यामुळे पुढील महिन्यांत किमतीतील वाढ कमी होईल, तसेच मध्य पूर्वेतील अशांततेमुळे तेलाच्या किमतीत अलीकडेच वाढ झाली असेही अहवा लात नमूद केले गेले आहे.
Comments
Add Comment

आता 'हे' कर्मचारी ऐन दिवाळीत आंदोलन करणार

मुंबई : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या गाडीवर भीषण हल्ला; दोन जवान शहीद, पाच जखमी

इंफाळ, मणिपूर: मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात आज (१९ सप्टेंबर २०२५) सायंकाळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी आसाम

'काम होणार नसेल तर खुर्ची खाली करा': अजितदादांचा कामचुकार मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा; अजितदादा कोणावर भडकले?

नागपूर: 'लोकांची कामे होणार नसतील, तर खुर्ची खाली करा,' असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय

शेतक-यांच्या मागणीमुळे आता 'या' योजनेच्या निकषात करणार बदल

ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल

अभिनेत्री दिशा पटाणीच्या घराबाहेर गोळीबार; पाच आरोपींपैकी कोणाचे काय झाले ?

जैतारण : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणीच्या उत्तर प्रदेशमधील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही

गायक झुबीन गर्गचे ५२ व्या वर्षी अपघाती निधन

सिंगापूर : मूळचा आसामचा असलेला लोकप्रिय बॉलिवूड गायक झुबीन गर्ग याचे ५२ व्या वर्षी निधन झाले. सिंगापूरमध्ये