Stock Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आज गुंतवणूकदारांची ४.४३ लाख कोटींची कमाई युद्धबंदीचा परिणामातून सकारात्मकतेत भर! सेन्सेक्स १५८.३२ व निफ्टी ७२.४५ अंकांने वाढला

  33

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात चालत्या गाडीला खिळ लागली आहे. सकाळच्या तुफानीनंतर पुन्हा बाजाराने 'युटर्न 'घेतल्याने बाजार बंद होताना अपेक्षित उसळी मारू शकला नाही.परिणामी आज शेअर बाजारात सेन्से क्स (Sensex), व निफ्टी ५० (Nifty 50) मध्ये तुलनात्मकदृष्ट्या मर्यादित वाढ झाली आहे.सेन्सेक्स १५८.३२ अंकाने वाढत ८२०५५.११ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ७२.४५ अंकाने वाढत २५०४४.३५ पातळीवर स्थिरा वला आहे.सेन्सेक्स बँक निर्देशांकात अखेरीस सकाळप्रमाणेच वाढ मजबूत स्थितीत राहिली आहे. बँक निर्देशांकात क्षेत्रीय विशेष फंडामेंटल मजबूत असल्याने सेन्सेक्स बँक निर्देशांक ७४८.४८ अंकांने वाढला. बँक निफ्टीत ४३२.८० अंकांची भर पडली आहे. आज बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदारांचे बाजार भांडवल ४.४३ लाख कोटींनी वाढले आहे.त्यामुळे आज गुंतवणूक मालामाल होण्यास मदत झाली आहे.बँक निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे बाजारातील सपोर्ट पातळी (Su pport Level) कायम राहिली आहे.सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५३%,०.६६% वाढ झाली आहे तर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices)मध्ये तेल व गॅस (०.१२%),व मिडिया (१.०६%)समभाग वगळता इतर निर्देशांकात वाढ झाली आहे.सकाळप्रमाणेच अखेरीस मिडिया समभागात घसरण कायम राहिली आहे तर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाल्यानंतरही अस्थिरतेच्या मानसिक दबावामुळे गुंतवणूकदारांनी तेल व गॅस सभभागाला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही.


क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (१.४७%),खाजगी बँक (०.८१%),कंज्युमर ड्युरेबल्स (०.६७%),मेटल (१.०८%),फायनांशियल सर्विसेस (०.९३%),ऑटो (०.७०%) समभागात वाढ झाली आहे.विशेषतः अखेरच्या सत्रात भारती य बाजारातील अस्थिरता निर्देशांक वीआयएक्स (Indian Volatility Index VIX) हा नकारात्मक राहिल्याने खळबळजनक चढउतार आज पहायला मिळाली नाही.आज वीआयएक्स केवळ -४.२०% होता.किंबहुना बँक व फायनांशियल सर्विसेस समभागात स्थिरता पहायला मिळाली होती.मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अर्धा ते एक टक्क्याने वाढ झाल्याने बाजार 'ग्रीन'च राहण्यास मदत झाली. दुसरीकडे इस्त्राईल व इराणच्या तुंबळ युद्धाला सिझफायरने पूर्णविराम लागला तरी आजही बाजार तितकेसे निर्धास्त आहे.आजही दबावाचा अंडरकरंट कायम असताना गुंतवणूकदारांनी अधिक लक्ष क्षेत्रीय निर्देशांकातील सकारात्मक गोष्टींकडे दिले होते.


बीएसई (BSE) मधील एकूण ४१३२ समभागांपैकी २६३८ समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला असून १३४० समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे. आज २५९ शेअर्स अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत. एनएसई (NSE) यामध्ये २९७६ समभागांपैकी १९६६ समभाग तेजीत राहिले आहेत तर ९१७ समभागात घसरण झाली आहे. आज इस्त्राईल व इराण संघर्षाची अंतिम टप्प्यापर्यंत वाटचाल चालू झाली आहे.कच्च्या तेलाच्या निर्देशांकात व किंमतीत मोठी वाढ होणार या चिंतेने गुंतवणूकदार धास्तावलेले होते.मात्र त्यातही आज अपेक्षित आल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात व किंमतीत प्रचंड मोठी घसरण दिवसाअखेर झाली आहे.कच्च्या तेलाच्या निर्देशांकातील Brent Future मध्ये २.७२% व WTI Futures मध्ये २.६१% घसरण झाली आहे. प्रति बॅरेल तेलाची किंमत ६६ डॉलर्सवर पोहोचली आहे जे यापूर्वी ६८ डॉलरहून अधिक वाढले होते.सोन्याच्या व चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली होती. अखेरच्या सत्रा भारतीय रूपयां च्या तुलनेत डॉलरमध्ये वाढ झाली होती. अखेर भारताचा रूपया प्रति डॉलर ८६ रूपयांवर स्थिरावला आहे.याखेरीज अमेरिकन बाजार उघडल्यावरच बाजारात सकारात्मक वाढ झाली आहे.परवाच्या पडझडीनंतर, गेले दोन दिवस युद्धाच्या पार्श्वभूमीवरही युएस अर्थव्यवस्थेत भरवसा ठेवल्याने बाजारात वाढ झाली होती.


आज जागतिक पातळीवर अमेरिकन बाजार उघडताच डाऊ जोन्स (Dow Jones) मध्ये ०.७१%,एस अँड पी ५०० (S &P 500) मध्ये ०.९६%,नासडाक (NASDAQ)०.९४%% घसरण झाली आहे.गिफ्ट निफ्टीत मोठी घसरण झाल्यानंतर आशियाई बाजारातही घसरणीचा ट्रेंड कायम राहिला आहे.निकेयी २२५ (Nikkei225)१.१३%,हेगंसेंग (२.०२%),शांघाई कंपोझिट (१.१४%)व जवळपास सगळ्याच बाजारात वाढ झाली आहे.इराणने यापूर्वी अद्याप कोणताही करार झालेला नाही परंतु जर इस्रायलने तेहरान वेळेनुसार पहाटे ४ वाजेपर्यंत हल्ले थांबवले तर ते प्रत्युत्तर देणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर अधिकृतपणे टीव्हीनेही युद्धबंदीची घोषणा केली.इस्रायलने इराणच्या आण्विक क्षमता नष्ट करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे असे अधोरेखित केले होते .


या युद्धबंदीच्या घोषणेमध्ये सर्वात जास्त नुकसान तेलाचे झाले आहे,ब्रेंट काल रात्री ८% पेक्षा जास्त घसरला आणि आज सकाळी आणखी ५% घसरला,जो प्रति बॅरल ७० डॉलर्सच्या पातळीपेक्षा खाली आला होता जो आता ६७ ते ६८ डॉलर बॅरेलवर पोहोचला आहे.याशिवाय युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोमी पॉवेल यांच्या व्याजदर कपातीवरील भाषणावर लक्ष ठेवून आहेत.


आज शेअर बाजारात वाढ एलटी फूड (८.९%),जेएम फायनांशियल (७.७८%),उषा मार्टिन (७.०६%),कॅप्रीग्लोबल (५.१७%),कजारिया सिरामिक (४.८६%),वोडाफोन आयडिया (४.७३%),स्वान एनर्जी (४.५१%),अनंत राज (४.०५%), होंडाई मोटर्स (३.५९%),एल अँड टी फायनान्स (३.०५%),अंबुजा सिमेंट (३.४८%),सिमेन्स इंडिया (३.४६%),अदानी ग्रीन एनर्जी (२.७९%),जिओ फायनांशियल सर्विसेस (२.६१%),कॅनरा बँक (२.५९%),अदानी पोर्टस (२.५६%),इंटरग्लोब एव्हिएशन (२.५५%),बजाज होल्डिंग (२.३४%),मदर्सन (२.३०%),ग्रासीम इंडस्ट्रीज (२.१०%) या समभागात झाली आहे.


तर सर्वाधिक घसरण गार्डन रिच (८.८७%),बीईएमएल (७.२२%),ऑईल इंडिया (५.५८%),लिंडे इंडिया (४.४३%), भारत डायनॅमिक (४.१२%),झी एंटरटेनमेंट (४.०६%),किर्लोस्कर ब्रदर्स (३.३९%), न्यूजेसॉफ्टवेअर (३.१३%),ओएनजीसी (२.९७%),डेटा पॅटर्न (२.९५%),कोचीन शिपयार्ड (२.९४%),झेन टेक्नॉलॉजी (२.९४%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (२.८२%),अव्हेन्यू सुपरमार्ट (१.९७%,),पॉवर ग्रीड (१.४८%),डिवीज (१.०६%),ट्रेंट (१.०२%),इंडसइंड बँक (०.९५%), मारुती सुझुकी (०.६९%),एचसीएल टेक्नॉलॉजी (०.६७%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'युद्धबंदीची घोषणा आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र घसरणीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत सुरुवाती चा फायदा अल्पकाळ टिकला कारण मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांच्या भावना अस्थिर झाल्या. मुदत संपण्याच्या दिवसाच्या गतिमानतेमुळे अनिश्चिततेत वाढ झाली आणि अस्थिरता वाढली.बाजाराने अलीकडील एकत्री करण श्रेणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असला तरी, सततचे जागतिक धोके गतीला अडथळा आणत आहेत.पुढे जाऊन,वाढीचा ट्रेंड टिकवून ठेवणे देशांतर्गत कमाईच्या ताकदीवर अवलंबून असेल, अनुकूल देशांतर्गत समष्टि अर्थशास्त्रा द्वारे समर्थित आगामी तिमाहीच्या निकालांभोवती आशावाद असेल.'


आजच्या बाजारातील निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,' मध्य पूर्वेकडील संकट क्षेत्रातील अपडेट्समुळे भारतीय शेअर बाजारांवर परिणाम झाला असल्याने निफ्टी अत्यंत अस्थिर राहिला.तथापि,एकूणच भावना सकारात्मक राहिल्या आहेत, २५,३५० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.तात्काळ आधार २५,००० वर आहे.या पातळीपेक्षा कमी झाल्यास तो २४,८५० पर्यंत घसरू शकतो.दुसरीकडे,जर निर्देशांक २५,००० च्या वर राहिला तर ताकद कायम राहू शकते आणि भावना दीर्घकाळ चालणाऱ्या व्यापार्‍यांना अनुकूल ठरू शकते.'


आजच्या रूपयाच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष व रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की, 'कच्च्या तेलाच्या किमतीत १२% घट झाल्याने रुपया ०.७८ ने मजबूत होऊन ८६.०१ वर पोहोचला, ज्यामुळे चलन ८६.७५ च्या जवळ असलेल्या त्याच्या पूर्वीच्या नीचांकी पातळीवरून स्थिर होण्यास मदत झाली. FII च्या नव्या प्रवाहाच्या अपेक्षेने रुपयाला बळकटी मिळाली.बाजारातील सहभागी पुढील संकेतांसाठी फेड चेअरच्या आगामी साक्षीवर बारकाईने लक्ष ठेवतील.रुपया ८५.७५ ते ८६.२५ च्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' घसरत्या व्यापार सत्रात बेंचमार्क निर्देशांकांमध्ये अस्थिरता वाढली.युद्धबंदीच्या घोषणेमुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र सुधार णांमुळे सुरुवातीचे तेजी अल्पकाळ टिकली कारण मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांच्या भावना मंदावल्या.डेरिव्हेटिव्ह एक्सपायरीशी संबंधित चढउतारांमुळे सत्रावर आणखी परिणाम झाला,ज्यामुळे दिवसाच्या आत अशांतता वाढली. निफ्टी ५० ने लक्षणीय अंतर वाढले आणि सुरुवातीच्या व्यापारात तो वाढला, मध्य सत्रादरम्यान तो २५,३१७ च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला.तथापि,उच्च पातळीवर नफा बुकिंगमुळे वाढीमध्ये तीव्र घट झाली,निर्देशांक २५०४४.३५ वर स्थिरावला, ७२ अंकांनी किंवा ०.२९% ने वाढला.


क्षेत्रीय आघाडीवर,निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकाने चांगली कामगिरी केली, १.५% वाढ केली, त्यानंतर निफ्टी मेटलचा क्रमांक लागतो, ज्याने १% वाढ नोंदवली.निफ्टी बँक,ऑटो,प्रायव्हेट बँक आणि कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक देखील हिर व्या रंगात बंद झाले,प्रत्येकी ०.३%-०.७% दरम्यान वाढला.याउलट,निफ्टी मीडियाने कमी कामगिरी केली,१% घसरण झाली. व्यापक बाजारांनी त्यांची सकारात्मक गती कायम ठेवली, निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशां कांनी प्रत्येकी ०.७% ची भर घातली,ज्यामुळे आघाडीच्या समभागांपेक्षा गुंतवणूकदारांमध्ये रस वाढत असल्याचे दिसून आले.'


बाजारातील निफ्टीविषयी बोलताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'निर्देशांकाने उच्चांकी आणि उच्चांकी पातळीसह बेअर कॅन्डल बनवले, ज्यामध्ये स्टॉक विशिष्ट कृती दरम्यान इंट्राडे अस्थिरता दर्शविली गेली.निफ्टीने पहिल्या सहामाहीत तेजी मिळवली आणि मध्य सत्रात इंट्राडे उच्चांक २५३१७ वर पोहोचला. तथापि,उच्च पातळीवर विक्रीच्या दबावामुळे निर्देशांकाने त्याचे बहुतेक फायदे सोडले. प्रक्रियेत निर्देशांक गेल्या सहा आठवड्यांच्या श्रेणीच्या वरच्या बँडच्या (२५२५०-२४४००) वर बंद होऊ शकला नाही.पुढे जाऊन, आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक सकारात्मक पूर्वाग्रह राखेल आणि येत्या सत्रात गेल्या सहा आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणीच्या वरच्या बँडची २५,२००-२५,२५० पुन्हा चाचणी करेल. २४,७००-२४,८०० पातळींपेक्षा तात्काळ पूर्वाग्रह सकारात्मक राहील कारण २० दिवसांच्या EMA आणि गेल्या आठवड्याच्या नीचांकी पातळीचा संगम आहे. वरच्या बाजूला गेल्या ६ आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणीच्या वरच्या बँडवर च्या बँडच्या वरचा निर्णायक ब्रेकआउट जवळच्या काळात २५,५०० च्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करेल.'


बाजारातील बँक निफ्टीवर प्रतिक्रिया देताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'बँक निफ्टीने उच्च उच्च आणि उच्च निम्न सिग्नलिंग पॉझिटिव्ह बायससह एक उच्च तरंग मेणबत्ती तयार केली. प्रक्रियेत निर्देशांक त्याच्या अलीकडील (५७०४९-५५१४९) ८०% पेक्षा जास्त मागे गेला.पुढे जाऊन,निर्देशांक सकारात्मक बायस राखेल आणि येत्या आठवड्यात ५७,०५० आणि ५७,६०० पातळीच्या आसपास असलेल्या सर्वकालीन उच्चांकाकडे जाईल. तात्काळ बायस ५५,४०० पातळीच्या वर सकारात्मक राहील कारण हा अलीकडील एकत्रीकरण क्षेत्राचा आणि गेल्या आठवड्यातील नीचांकी पातळीचा संगम आहे.दैनिक स्टोकास्टिक अपट्रेंडमध्ये राहतो त्यामुळे पॉझिटिव्ह बायसची पुष्टी होते. ५० दिवसांच्या EMA आणि मागील अप मूव्हच्या की रिट्रेसमेंट पातळीचा संगम असल्याने की सपोर्ट ५४,५००-५४,००० पातळीवर ठेवला आहे.'


त्यामुळे आजच्या बाजारातील परिस्थिती पाहता उद्याची हालचाल इराण व इस्त्राईल यांच्यातील शाब्दिक चकमकीवरही अवलंबून राहू शकतो असा कयास आहे मात्र दुसरीकडे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का नाही या आशेवर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची हालचाल फेडचे अध्यक्ष जेरोमी पॉवेल यांच्या भाषणावर अवलंबून असू शकते.तसेच भारतीय बाजारावरील एस अँड पी ग्लोबलने भारतीय जीडीपीबाबत सकारात्मकता दाखवल्यानेही बाजारात औत्सुक्याचे वातावरण कायम राहू शकते असा अंदाज आहे.

Comments
Add Comment

इस्रायलमधून मायदेशी परतले ५९४ भारतीय

नवी दिल्ली : इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी

Railway ticket price : रेल्वेच्या तिकिट दरात वाढ, तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम जारी...

मुंबई : देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय

इराण-इस्रायल युद्ध : ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे संभ्रम

पश्चिम आशियातील तणाव: ट्रम्प यांचा दावा, इराणने खोडला तेहरान : इराण-इस्रायल युद्धानं नवं वळण घेतलंय. इराणने

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

अमावास्येच्या दिवशी ही कामे करताय सावधान ..!

मुंबई : अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही काही कामे करत असाल तर सावधान ..! जर तुम्ही अमावास्येला काही काम करताना हे

Actor Srikanth Arrest : दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक!

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी