Homemade Body Scrub : उन्हाळ्यात 'हे' घरगुती स्क्रब ठरतील फायदेशीर, त्वचा होईल चमदार

उन्हाळ्यात तीव्र ऊन, आर्द्रतेमुळे चेहरा काळवंडतो. कडक उन्हामध्येही चेहरा फ्रेश राहावा, चेहऱ्यावरची चमक कायम राहावी यासाठी कॉफी स्क्रब हा अतिशय उत्तम पर्याय आहे. प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि मृत त्वचेच्या पेशींमुळे त्वचा निस्तेज आणि खडबडीत होऊ शकते. कॉफी बॉडी स्क्रबमुळे त्वचा उजळून येईल. हा स्क्रब उन्हाळ्यात खुप फायदेशीर ठरेल.


कॉफी आणि नारळ तेल

कॉफी आणि नारळ तेलचा स्क्रब हा सर्वात सोप्या आणि प्रभावी स्क्रबपैकी एक असून नारळ तेल त्वचेला खोलवर आर्द्रता देतं आणि कॉफी मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतं. दोन मोठे चमचे खोबरेल तेलात अर्धा कप कॉफी पावडर मिसळा. हे मिश्रण हळुवारपणे संपूर्ण शरीरावर चोळा. हा स्क्रब कोरड्या त्वचेला आराम देतो आणि त्वचेला मऊ बनवण्यास उपयुक्त ठरतो.


कॉफी आणि ब्राऊन शुगर

कॉफी आणि ब्राऊन शुगरचा स्क्रब त्वचेवर मृत पेशींचा थर साचला असेल, तर हा स्क्रब उत्तम आहे. साखरेचे कण त्वचेला खोलवर स्वच्छ करतात, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी दिसते. हे स्क्रब तयार करण्यासाठी समान प्रमाणात कॉफी आणि ब्राऊन शुगर घेऊन त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल घाला.


कॉफी आणि मध

कॉफी आणि मधाचा स्क्रब मधात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि डाग कमी करण्यास मदत होते. त्वचेचा रंग एकसमान करण्यासाठी आणि नैसर्गिक चमक आणण्यासाठी हा स्क्रब उत्तम आहे. २ चमचे कॉफी पावडरमधे एक चमचा मध आणि थोडं गुलाबजल मिसळून हे स्क्रब तयार करा.


कॉफी आणि दही

कॉफी आणि दही हा स्क्रब उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल, तर उत्कृष्ट ठरेल. दही आणि कॉफीचं मिश्रण खूप प्रभावी ठरतं. दह्यातील लॅक्टिक ॲसिड काळवंडलेपणा दूर करतं, तर कॉफीमुळे त्वचा ताजीतवानी वाटते. अर्धा कप दह्यामधे ३ चमचे कॉफी पावडर मिसळा. हे मिश्रण शरीरावर लावून, दहा - पंधरा मिनिटं तसेच राहू द्या आणि नंतर स्क्रब करून काढून टाका.


कॉफी आणि दालचिनी

कॉफी आणि दालचिनीचा स्क्रब कॉफी आणि दालचिनीचं मिश्रण शरीराच्या ज्या भागांवर अतिरिक्त चरबी किंवा सेल्युलाईट आहे, त्यांच्यासाठी उत्तम आहे. हे मिश्रण बनवण्यासाठी, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि थोडं बदामाचं तेल कॉफीत मिसळा.


स्क्रबिंग करताना नेहमी गोलाकार पद्धतीनं हळुवारपणे स्क्रब करा. बॉडी स्क्रब आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच वापरा. ​​अतिवापरामुळे त्वचा सोलली जाऊ शकते. मॉइश्चरायझर म्हणून स्क्रबिंगनंतर लोशन किंवा बॉडी बटर लावा. कोणतीही एलर्जी असल्यास योग्य ती काळजी घ्यावी.

Comments
Add Comment

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी

Nashik : नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यात १० हजार पक्षी थांबे

Nashik : राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गटांच्या शेतावर जैविक व नैसर्गिक पद्धतीने

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड