Poco F7 5g Launch: आज संध्याकाळी साडेपाच वाजता बहुप्रतिक्षित मिडरेंज Poco F7 स्मार्टफोन होणार लाँच 'ही' आहेत खास फिचर्स

प्रतिनिधी: पोको एफ ७ (Poco F7) हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे. आज हा नवा फोन संध्याकाळी ५.३० वाजता हा लाँच होणार आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन आलेला आहे.आज अधिकृतपणे हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल. पोको हा फोन शाओमी (Xiomi) कंपनीचा सहब्रँड आहे. हा फोन फ्लिपकार्टवर (Flipkart) या इ कॉमर्स संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.चीन व इतर आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन रिब्रँडिंग होऊन रेडमी टर्बो या नावाने विकला जात आहे.


पोकोचे होणार लाईव प्रक्षेपण (Poco F7 Live Streaming Event) -


पोकोचा लाँच इव्हेंट (Launch Event) हा कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर होणार आहे. पोको इंडिया असे या युट्यूब चॅनेलचे नाव आहे. तसेच फ्लिपकार्टवर देखील हा कार्यक्रम पोको स्मार्टफोनचे चाहते पाहू शकतील.


या फोनची चर्चा जगभरात सुरू आहे. प्राईज टू परफॉर्मन्स (Price to performance) या कामगिरीच्या खासियतमुळे हा फोन ओळखला जातो. त्यामुळे पोको ६ या फोनच्या यशांनतर टेकसेव्ही लोकांमध्ये फोनची भलतीच क्रेझ आहे. फोन विशेषतः किफायतशीर किंमतीत अधिक फिचर्ससह गेमिंग व परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे.


काय असतील Poco F7 वैशिष्ट्य (Specifications) अपेक्षित -


१) Battery: 7550 mAh बँटरी


२) Camera - ड्युअल कॅमेरा सेटअप, ५० मेगापिक्सेल with Sony LYT 600 Sensor तसेच ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा


३) Operating System- हायपरओएस २ (HyperOS 2)


४) Display: 6.83 inch 1.5k OLED Display Refresh Rate - १२० हर्टझ (120 Hz)


५) Display Brightness - 3200 nits


६) Processor - Snapdragon 8s Gen 4


७) Ram - १२ जीबी LPDDR5X RAM upto २४ जीबी


८) Charger - 90 W fast charger


९) UFS - ४.१


याशिवाय पोको एफ ७ अपेक्षित किंमत ३५००० हजार रूपयांच्या आसपास असू शकते असे सांगण्यात येत आहे. पोको एफ७ ची थेट स्पर्धा येणाऱ्या नथिंग फोन ३ (Nothing Phone 3) शी तुलना होईल होऊ शकते ज्यामध्येही स्नॅपड्रॅगन ८एस जनरेशन ४ प्रोसेसर असण्याची पुष्टी झाली आहे परंतु त्याची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे.


यात तीन रंग पर्याय असतील असणार आहेत ज्यामध्ये फ्रॉस्ट व्हाइट, सायबर सिल्व्हर एडिशन आणि फँटम ब्लॅक या रंगाचा समावेश आहे.तुम्ही पोको इंडिया आणि फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटद्वारे पोको एफ७ ५जी खरेदी करू शकता.


याशिवाय या मिडरेंज स्मार्टफोनमध्ये 3D IceLoop System, AI Temperature Control, 6000mm२ Vaper Chember अशी अत्याधुनिक फिचर्स असू शकतात. याशिवाय टिकाऊपणाच्या दृष्टीने फोनमध्ये IP68, IP69 रेटिंग मिळू शकते. पोको कंपनीने या स्मार्टफोनसाठी अभिनेता अक्षयकुमारला ब्रँड अँबेसेडर म्हणून करारबद्ध केले होते.

Comments
Add Comment

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत