निर्देशांक महाग कमीत कमी जोखीम घ्या

डॉ. सर्वेश : सुहास सोमण


शेअर बाजार हे गुंतवणुकीचे असे क्षेत्र आहे जिथे कित्येक गुंतवणूकदारांनी अत्यंत उत्तम नियोजन करून अतिशय चांगला फायदा मिळविलेला आहे. आपण शेअर बाजारात एखादा शेअर खरेदी केल्यावर त्यात वाढ झाली आणि त्यानंतर वाढलेल्या किमतीला जर आपण तो शेअर विकला, तर आपणाला फायदा होत असतो. उलट जर खरेदी केलेल्या किमतीपेक्षा जर कमी किमतीला शेअर विकला तर आपणास तोटा होत असतो. शेअर बाजारात या खरेदी आणि विक्रीत अत्यंत महत्त्वाची भूमिका असते तो म्हणजे “स्टॉपलॉस”.


“स्टॉपलॉस” या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. सरळ भाषेत बोलायचे झाल्यास नुकसान थांबविणे किंवा टेक्निकल भाषेत लॉस बुक करणे असा याचा अर्थ होतो. “स्टॉपलॉस” हा टेक्निकल अॅनालिसिस करून ठरवला जातो. “स्टॉपलॉस” म्हणजे एखाद्या शेअर्सची अशी पातळी की जर त्या पातळीच्या किंवा किमतीच्या खाली जर तो शेअर आला, तर त्या शेअरमध्ये आणखी मोठी घसरण होऊ शकते आणि जर त्या पातळीच्या खाली आल्यावर आपण “लॉस बुक” केला नाही, तर परिणामी आपण केलेल्या त्या गुंतवणुकीत आपले नुकसान आणखी वाढू शकते. बऱ्याचदा अनेक नावे आणि जुने गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा वापर करताना दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना होत असलेल्या नुकसानीपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागते. कित्येकदा अनेक गुंतवणूकदार टेक्निकलदृष्ट्या स्टॉपलॉस काय येतोय हे न पाहता आपल्या मनानेच स्टॉपलॉस ठेवतात आणि नुकसान करून घेतात. या उलट चतुर गुंतवणूकदार परिपूर्ण अभ्यास, संयम, योग्य नियोजन आणि स्टॉपलॉसचा योग्य वापर करून शून्यातून आपले विश्व उभे करतात. त्यामुळे माझ्या मते स्टॉपलॉस हा शेअर बाजारात खरेदी विक्री करीत असताना खऱ्या अर्थाने किंग मेकरची भूमिका बजावतो.


सध्या निर्देशांकात मोठी वाढ यापूर्वीच झालेली असल्यामुळे पुढील २ आठवड्यांचा विचार करता कमीत कमी जोखीम घेऊन व्यवहार करणे हेच योग्य ठरेल. व्यवहार करत असताना योग्य तो स्टॉपलॉस लावूनच व्यवहार करा. पुढील काळात निर्देशांकात फार मोठी हालचाल होणे अपेक्षित आहे. सर्वात जास्त जोखीम ही इक्वीटी मार्केटच्या तुलनेत डेरीव्हेटीव मार्केट अर्थात फ्युचर आणि ऑप्शन प्रकारात जास्त असते त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे.


मी माझ्या लेखमालेत लेखात “कॅम्स इंडिया” हा शेअर ३१०० ला असतानाच याने अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजीचे संकेत दिलेले आहेत हे सांगितलेले होते. त्यामुळे दीर्घमुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी विशेष रचना तयार झालेली असून किमतीला ३१०० ला असणाऱ्या या शेअरमध्ये मध्यम मुदतीसाठी तेजीचा व्यवहार केल्यास हा चांगली वाढ दाखविणे अपेक्षित आहे हे सांगितलेले होते. मी सांगितल्यापासून या शेअरने ४३०० हा उच्चांक नोंदविलेला आहे. मागील आठवड्यात हा शेअर ४१६७ ला बंद झाला.


(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

Comments
Add Comment

ग्रॅच्युइटी आता फक्त १ वर्षात; कोट्यवधी कामगारांना आर्थिक सुरक्षा

मुंबई : देशातील कामगार व्यवस्थेला अधिक सुलभ आणि आधुनिक बनवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून कामगार

अदानी समुहाकडून आणखी एक कंपनी १००% खरेदी 'ही' मोठी माहिती समोर

प्रतिनिधी: मूलभूत पायाभूत सुविधा उभारणी व डेटा सेंटर विस्तृत करण्यासाठी अदानी समुहाने आणखी एक मोठे पाऊल उचलले

Colliers survey insights: जागतिक रिअल इस्टेट बाजारात जबरदस्त आत्मविश्वास भारतात भांडवल प्रवाह स्थिर

मुंबई: नुकताच कॉलियर्सने त्यांचा २०२६ चा 'ग्लोबल इन्व्हेस्टर आउटलुक 'अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातील

बुडत्याचा पाय खोलात! युएस न्यायालयाचा BYJUs सर्वेसर्वा रविंद्रन यांच्या विरोधात धक्कादायक निकाल एडटेक कंपनीचे अस्तित्त्वच धोक्यात?

प्रतिनिधी: बायजूज (BYJUs) कंपनीचे सर्वेसर्वा व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी बायजूज रविंद्रन यांना युएस

मोठी बातमी: या हिवाळी अधिवेशनात सरकार जुन्या पुराण्या १२० कायद्यांना तिलांजली देणार अनेक आर्थिक सुधारणावादी 'ही' बिले मांडणार

प्रतिनिधी:संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. ज्यामध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा अपेक्षित आहे.

Special Stock Market Outlook: गेल्या आठवड्यात बाजारात सकारात्मकत आठवड्यात काय काय घडले? पुढील आठवड्यात काय निरिक्षण महत्वाचे जाणून घ्या एका क्लिकवर

मोहित सोमण: शेअर बाजारात सकारात्मकता कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सलग दुसऱ्यांदा शेअर बाजारात