विमा पर्यायांसह वाहनांचे संरक्षण कसे कराल?

शशिकांत दहुजा : श्रीराम जनरल इन्शुरन्स


अनेक महिन्यांचे कडक ऊन सोसल्यानंतर आगमन झाले आहे; परंतु वाहनमालकांसाठी पाऊस नवीन समस्यांची जंत्री आपल्यासोबत घेऊन येतो. पाण्याने तुंबलेले रस्ते, झाडांच्या तुटून पडलेल्या फांद्या आणि निसरडे रस्ते-पावसाळी दिवसांतील या स्थितीमुळे वरुणराजा केवळ अपघातांची शक्यता अन वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणच वाढवत नाही, तर वाहन चालविण्याच्या तुमच्या कौशल्याचीही परीक्षा घेत असतो. अशा परिस्थितीत वाहन विमा पॉलिसीचे महत्त्व लक्षात येते.
मॉन्सूनच्या प्रत्येक हंगामात वाहनमालकांना वाहन नुकसानीच्या अनेक सामायिक प्रकारांना तोंड द्यावे लागते. यात वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी घुसल्याने इंजिन बंद पडणे (हायड्रोस्टॅटिक लॉक), इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे टायर आणि रिमची झीज होणे, रस्त्यांवर डबक्यांतील खडीमुळे वाहनांच्या खालच्या भागाचे अथवा चॅसिसचे नुकसान होते. या प्रकारांमुळे वाहनमालकांना दुरुस्तीवर खूप खर्च करावा लागतो. दुर्दैवाने, अनेक वाहन विमा पॉलिसीमध्ये आवश्यक अतिरिक्त पर्यायी संरक्षण सुविधा (अँड-ऑन) नसल्याने या बिघाडांचा विमा संरक्षणात समावेश होत नाही. तुमच्या पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे-अन् त्यात काय कमतरता आहेत? एका प्रमाणित व्यापक वाहन विमा पॉलिसीमध्ये साधारणपणे दोन भाग असतात :
१. तृतीय-पक्ष उत्तरदायित्व - कायद्याने अनिवार्य
२. स्वतःच्या नुकसानीपासून (ओडी) संरक्षण – अपघात आणि नैसर्गिक आपत्तींसारख्या गोष्टींपासून संरक्षण.

मॉन्सूनच्या काळात पूर, वादळ किंवा झाडे तूटून पडल्याने होणारे अपघाती नुकसान, वाहन अडकून पडल्याने चोरी किंवा तोडफोडीसारखे नुकसान आणि भूस्खलन किंवा वीज कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या घटनांना ओडी सुविधा विमारुपी संरक्षण प्रदान करते; परंतु पाणी शिरल्यामुळे तुमच्या वाहनाच्या इंजिन, बॅटरी किंवा इलेक्ट्रिक घटकांना झालेल्या नुकसानीचे संरक्षण तुम्ही जोपर्यंत विशिष्ट अतिरिक्त संरक्षण पर्याय (अॅड-ऑन) विमा कवच घेत नाही, तोपर्यत प्रदान केले जात नाही.

पावसाळ्यात खरोखर सुरक्षित राहण्यासाठी, पावसाळ्याशी संबंधित विशिष्ट संरक्षण पर्यायांचा आधार घ्या :
१. इंजिन आणि गिअरबॉक्ससाठी संरक्षण कवच : पाणी साचलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवतात? की पाण्यात बुडालेली कार सुरू करण्याचा प्रयत्न करतात? यामुळे हायड्रोस्टॅटिक लॉक होऊ शकतो. या प्रकारात इंजिन आणि गिअरबॉक्स खराब होतात. हे विमा कवच अतिखर्चिक दुरुस्तीची परतफेड सुनिश्चित करते.

२. शून्य घसारा (शून्य घसारा) कवच : सामान्यतः, विमा कंपन्या वाहनांतील विविध भागांच्या घसारा आधारावर निधीमधून ३०-५० टक्के वजावट करत असतात; परंतु या सुविधेमुळे वाहनमालकाला प्लास्टिक, रबर आणि धातूसारख्या भागांवर संपूर्ण दाव्याची रक्कम मिळते.

३. टायर संरक्षण कवच : खड्डे, खड्डेमय रस्ते आणि खडी यामुळे टायर खराब होऊ शकतात. हे विमा कवच टायर दुरुस्ती किंवा बदलण्याच्या खर्चापासून तसेच मजुरीच्या खर्चापासून वाहनमालकाचे आर्थिक बचत करते.

४. बॅटरी संरक्षण कवच : पावसाळ्यातील ओलावा बॅटरीला पूर्णपणे निकामी करू शकते. विशेषतः इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांमध्ये हा प्रकार अनुभवायला येतो. हे पर्यायी संरक्षण महागडी बॅटरी बदलण्यासाठी येणारा तुमचा खर्च वाचवते.

५. रस्त्यावर थेट मदत (आरएसए): तुमची गाडी गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यात बंद पडलेली असेल किंवा सुरू होत नसेल तर ही सुविधा तुमच्या मदतीला धावून येते. रस्त्यावर थेट मदतींतर्गंत वाहनाचे टोइंग करणे, जंप-स्टार्ट करणे किंवा किरकोळ मदतीसाठीसुद्धा २४x७ सहाय्य पुरविले जाते.

६. पूरसमयी मदतीचे संरक्षण : पुरात वाहनाचे अनेक भाग पाण्याखाली बुडालेले असतील तर? हे विमा संरक्षण तुमच्या कारच्या आतील भागाची स्वच्छता करणे, सुकविणे आणि पुनर्संचयित करण्यास मदत करते. जर तुमची कार सुरु होत नसेल तर टोइंग शुल्काचा खर्च देखील ही पर्यायी सुविधा पुरवते.

७. संपूर्ण मूल्यांची भरपाई (इनव्हॉइस कव्हर) : पूर-संबंधित घटनांमुळे संपूर्ण नुकसान झाले अथवा वाहनाची चोरी झाल्यास, हे पर्यायी संरक्षण रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कासह तुम्ही विमा संरक्षणासाठी भरलेल्या संपूर्ण मूल्यांची भरपाई मिळण्याची
शाश्वती देते.

८. उपभोग्य वस्तूंसाठी संरक्षण : इंजिन ऑइल, ब्रेक फ्लुइड, नट, बोल्ट आणि ल्युब्रिकंट्स सारख्या छोट्या भागांनासुद्धा विमा संरक्षण दिले जाते. या सुविधेत ज्या वस्तूंसाठी सहसा परतफेड केली
जात नाही.

मान्सूनपूर्व विम्याची एक जलद तपासणी यादी :
१) विम्याची वैधता तपासा आणि विम्याचे अतिरिक्त संरक्षण पर्याय अदयावत करा.
२) विमा कंपनीची हेल्पलाइन आणि रोडसाइड असिस्टन्स क्रमांक नेहमी तुमच्याजवळ ठेवा.
३) जलद आणि त्रासमुक्त दुरुस्तीसाठी तुमच्या जवळच्या कॅशलेस गॅरेजची माहिती तुमच्याजवळ ठेवा.
४) कागदपत्रांची आवश्यकता आणि फोटो/ व्हिडिओ पुराव्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे समजून घ्या.
Comments
Add Comment

डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एका धक्का- भारतावरील टॅरिफ वाढ रद्दच व्हावी यासाठी युएस धोरणकर्त्यांचीच न्यायालयात धाव

प्रतिनिधी: डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक झटका स्वगृही मिळाला आहे. भारतासह इतर देशावर लावलेल्या भरमसाठ

ना घरका ना घाटका ! ट्रम्पविरोधात युएसमध्येच असंतोष, एच१बी व्हिसा निर्णयावर फेडरल न्यायालयात धाव

मुंबई: ना घरका ना घाट का अशी परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली दिसते. भारतासह इतर देशावर देशहिताच्या

गेल्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात १.०३ अब्ज डॉलरने वाढ

प्रतिनिधी: परकीय चलन संकलनात (Forex Reserves) किरकोळ वाढ नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. आरबीआयच्या नव्या 'विकली सॅस्टिटिक्स

प्रहार शनिवार अर्थविशेष: घरातील पेटत्या भयानक विषमतेच्या भस्मासूराला वेळीच आवरा!

मोहित सोमण आपण वास्तविक जगात राहतो वास्तविक जीवनात खातो जगतो पण कधीकधी भीषण वास्तविकता आपल्या नजरेसमोर येत

गौतम अदानी यांचे पुतणे प्रणव अदानी सेबीकडून 'दोषमुक्त' इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात क्लीनचीट!

प्रतिनिधी: उद्योगपती गौतम अदानी यांचा पुतण्या प्रणव अदानी यांना इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात सेबीने क्लिनचीट

CPI Novemeber Inflation: नोव्हेंबरमध्ये ग्राहक महागाईत किरकोळ वाढ, सगळी वाढ बिगर भाजप राज्यात, महाराष्ट्रात महागाईत घसरण

मोहित सोमण:बिगर भाजप राज्यात यंदा सर्वाधिक वाढ ग्राहक महागाईत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार,सर्वाधिक