अॅमेझॉन पेकडून वाहन विमा पोर्टफोलिओचा विस्‍तार

मुंबई : ‘अॅमेझॉन पे’ने आज आपल्‍या वाहन विमा पोर्टफोलिओच्‍या विस्‍तारीकरणाची घोषणा केली, जेथे एचडीएफसी एर्गो, अॅको आणि आयसीआयसीआय लोम्‍बार्ड यांच्‍यासोबत सहयोगांच्‍या माध्‍यमातून देशभरात कार्स व दुचाकींवर कमी किमतीत विमा संरक्षण उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. ग्राहक आता प्रत्‍यक्ष अॅमेझॉन पेच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या वाहन विम्‍यासाठी योग्‍य प्‍लॅनचा शोध घेऊ शकतात आणि सहजपणे त्‍यांच्‍या वाहनांसाठी विमा संरक्षण मिळवू शकतात.


देशभरातील २५० दशलक्षहून अधिक दुचाकीमालक आणि ३० दशलक्ष कारमालक आता अॅमेझॉन अॅपच्‍या माध्‍यमातून काही मिनिटांमध्‍ये सहजपणे स्‍पर्धात्‍मक किमतींत वाहन विमा खरेदी करू शकतात. या सेवेमुळे विमा प्रक्रियेतील समकालीन अडथळे दूर झाले आहेत, जसे दुचाकींच्या प्रत्यक्ष तपासणीची गरज भासत नाही, विमा पॉलिसी त्वरित डिजिटल स्वरूपात दिली जाते आणि पॉलिसी घेताना ग्राहकांना कोणत्याही सेल्स कॉल्सचा त्रास होत नाही. ग्राहकांना आता संपूर्ण भारतातील ९,००० हून अधिक नेटवर्क गॅरेजमध्ये पॉलिसीच्या अटींनुसार कॅशलेस क्लेम सुविधा उपलब्ध होईल. ही सुविधा फक्त महानगरांपुरती मर्यादित नसून कोईम्बतूर, कोटा, ग्वाल्हेर, जमशेदपूर, झाशी, उडुपी, संबलपूर, अलवर आणि भरतपूर यांसारख्या दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांपर्यंत विस्तारण्यात आली आहे.


''अॅमेझॉन पे भारतातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीसाठी नाविन्‍यपूर्ण बदल करण्‍याचा, त्‍यांचे जीवन सोपे करण्‍याचा आणि त्‍यांच्‍या पेमेंट व आर्थिक गरजांची पूर्तता करत महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न करते. आमच्‍या वाहन विमा पोर्टफोलिओच्‍या नवीन विस्‍तारीकरणामधून आमची कटिबद्धता दिसून येते. भारतातील ७० टक्‍क्‍यांहून अधिक नोंदणीकृत दुचाकींचा विमा नाही आहे, ज्‍यामुळे आम्‍ही द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांपर्यंत विमा अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे, जेथे विमा उपलब्‍धता मर्यादित आहे. सर्वसमावेशक कॅशलेस गॅरेज नेटवर्क आणण्‍यासाठी भारतातील सर्वात विश्वसनीय विमा कंपन्‍यांसोबत सहयोग करत आम्‍ही सेवा देण्‍यासोबत रस्‍त्‍यावरील लाखो वापरकर्त्‍यांसाठी महत्त्वपूर्ण संरक्षण कवच देत आहोत, तसेच आर्थिकदृष्‍ट्या अधिक सुरक्षित समाज घडवण्‍यास मदत करत आहोत,'' असे अॅमेझॉन पे इंडियाचे सीईओ विकास बंसल म्‍हणाले.

हा विमा प्रवास सुलभ आणि पूर्णपणे डिजिटल असण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामध्‍ये दुचाकींच्‍या प्रत्‍यक्ष तपासणींची गरज भासत नाही. ग्राहक त्‍यांच्‍या वाहनाचा नोंदणी क्रमांक प्रविष्‍ट करू शकतात, त्‍यांच्‍या पसंतीचे विमा संरक्षण निवडू शकतात आणि काही पायऱ्यांमध्‍ये विमा खरेदी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. काही मिनिटांमध्‍ये पॉलिसीची प्रक्रिया केली जाते, ज्‍यानंतर पॉलिसी सहजपणे उपलब्‍ध होण्‍यासाठी व संदर्भासाठी त्‍यांच्‍या अॅमेझॉन ऑर्डर्स पेजवर त्‍वरित उपलब्‍ध होते. ही संपूर्ण प्रक्रिया १०० टक्‍के डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाते. तसेच, ग्राहक अॅमेझॉन पेच्‍या माध्‍यमातून विनासायासपणे पेमंट्स करू शकतात आणि अतिरिक्‍त कॅशबॅक फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.


अॅमेझॉन पे वाहन विम्‍याचे फायदे:


• स्‍पर्धात्‍मक व परवडणारे प्रीमियम्‍स.
• विविध विमा कंपन्‍यांची तुलना करून योग्‍य प्‍लॅन निवडता येतो.
• सेल्स कॉल्सचा कोणताही हस्तक्षेप न होता जलद डिजिटल नोंदणी.
• विमा कंपनीकडून प्राइम सदस्‍यांना विमा प्रीमियमवर विशेष सूट.

Comments
Add Comment

Narendra modi: पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा शुभारंभ

नवी दिल्ली : रोजगारनिर्मिती, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या

PhonePe वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी ! वॉलेट वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असताना PhonePe ने आपल्या वॉलेट वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा नियम

Gold Silver Rate Today : संधी चुकवू नका ! सोने 6000 तर चांदी 23 हजारांनी घसरली; सोने चांदीचे आजचे दर काय ?

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ उतार पहायला मिळत आहे. अशातच सोने खरेदी करून

Income Tax Return : ITR भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आयकर फॉर्ममध्ये झाले मोठे बदल

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) आता करदात्यांच्या माहितीची पडताळणी अधिक सूक्ष्मपणे करत आहे. आर्थिक वर्ष

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचे (Arrears) नवे गणित; ९३ लाख रुपयांपर्यंत मिळणार लाभ?

Navi Delhi: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन

Crude Oil Prices : अमेरिका-इराण शांतता कराराचा तेल बाजारावर परिणाम; क्रूड ऑईल घसरलं, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर काय?

अमेरिका आणि इराण यांच्यातील दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिकेचे