Home Credit India Survey: अहवालामधून समोर आला आव्हानांशी जुळवून घेत त्यावर मात करणारा कनिष्ठ मध्यमवर्गाचा नवा चेहरा

होम क्रेडिट इंडियाच्या ‘द ग्रेट इंडियन वॉलेट २०२५ अहवाल प्रसिद्ध


अहवालानुसार काही महत्वाची निरिक्षणे -


७३% लोकांना पुढील ५ वर्षांत आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याची खात्री आहे


६५% लोकांच्या मते आर्थिक अपेक्षा पूर्ण करण्यात परवडणाऱ्या कर्जाची मदत होते


६३% ग्राहक मानतात की डिजिटल साधनांमुळे आर्थिक उद्दिष्टे गाठणे अधिक सोपे झाले आहे


५७% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की या वर्षी त्यांचे उत्पन्न वाढले आहे


५०% प्रतिसादकर्त्यांनी या वर्षी बचत केल्याचे सांगितले असून, २०२४ मधील ६०%च्या तुलनेत हे प्रमाण घसरले आहे


१२% प्रतिसादकर्ते मुलभूत गरजा भागवण्यासाठी कर्ज घेत आहेत


शिक्षणावरील खर्चामध्ये पूर्वीच्या तुलनेने ३४ % वाढ झाली आहे


पुरुष ग्राहकांपैकी २९ % पुरुषांना, परवडणारे कर्ज हे आर्थिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक वाटते


स्थानिक पर्यटन हा जीवनशैलीतील एक महत्त्वाचा बदल म्हणून पुढे आला असून,३१ % ग्राहक दर महिन्याला एकदा तरी जवळची ठिकाणे पाहण्यासाठी जात आहेत


जेन-झी प्रतिसादकर्त्यांपैकी २६% व्यक्तींनी अधिक चांगल्या नोकरीच्या संधींवर भर दिला, जेणेकरून आपल्या इच्छा लवकर पूर्ण करता येतील


मुंबई: होम क्रेडिट इंडिया या आघाडीच्या ग्राहक वित्त सेवा कंपनीने आज आपल्या महत्त्वपूर्ण अहवालाच्या तिसऱ्या आवृत्तीमधील निष्कर्ष जाहीर केले.‘द ग्रेट इंडियन वॉलेट 2025’ या अभ्यासामधून, भारतातील कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजा च्या आर्थिक दृष्टीकोनात होत असलेले मोठे बदल समोर आले आहेत.‘मॅपिंग इंडिया’ज अस्पिरेशन:द ड्रीम्स इन एव्हरी वॉलेट’या संकल्पनेवर आधारित या अभ्यासामध्ये देशातील दोन-तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यात आले आहे. यामधून एक खंबीर, आशावादी आणि डिजिटल साधनांना आपलेसे करणारा नवा गट दिसून येतो, जो केवळ दोन वेळचे खाऊन जगण्यासाठी नाही तर आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले पुढे टाकत आहे.


या अभ्यासामधून देशभरातील ग्राहकांचे आर्थिक आयुष्य जवळून समजून घेता येऊ शकते.यामध्ये फायनान्शियल वेल-बीईंग इंडेक्ससोबतच उत्पन्न,खर्च,वॉलेट शेअर,आकांक्षा आणि ऐच्छिक खर्च याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. या अभ्यासानुसार,देशाची आर्थिक स्थिती सशक्त असल्याचे दिसून येते.ग्राहक विचारपूर्वक नियोजन करत असून वाढत्या खर्चाला सामोरे जाताना त्यांच्या अपेक्षाही उंचावत चालल्या आहेत.शिक्षण,रोजगाराच्या संधी आणि परवडणाऱ्या कर्जावर  भर या बाबींमधून ही वृत्ती अधिक ठळकपणे दिसून येते.


'२०२३ मध्ये ‘द ग्रेट इंडियन वॉलेट स्टडी’ची सुरुवात करताना आम्ही भारताच्या आर्थिक प्रवाहाची दिशा समजून घेण्याचा प्रयत्न केला होता.तेव्हा आम्हाला शांतपणे क्रांती घडवणारा एक देश दिसून आला होता. कोट्यवधी कुटुंबांनी अडथळ्यां चे यशाकडे नेणाऱ्या पायऱ्यांमध्ये आणि आव्हानांचे संधींमध्ये रुपांतरीत केले आहे' असे होम क्रेडिट इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी आशिष तिवारी यांनी सांगितले आहे.ते पुढे म्हणाले,'या वर्षीचे निष्कर्ष हे अधिक प्रेरणादायी आहेत.आर्थिक आव्हानांचे सावट असतानाही भारतातील कनिष्ठ मध्यमवर्ग अधिक आशावादी,अधिक डिजिटल आणि पूर्वीपेक्षा अधिक ठामपणे पुढे जात आहे.त्यांची आर्थिक नियोजनबद्ध जीवनशैली,उद्योजकता आणि पुढच्या पिढीच्या प्रगतीसाठीचा दृढ संकल्प आम्हाला सातत्याने नावीन्य घडवण्यासाठी आणि त्यांच्या #ZindagiHit करण्यासाठी खरी साथ देण्यासाठी प्रेरित करतो.'


भारताच्या आर्थिक नाडीचा वेध


या अहवालातून भारतातील कनिष्ठ मध्यमवर्गामधील आशावादाचे स्पष्ट चित्र समोर येते.होम क्रेडिट इंडियाच्या ‘फायनान्शियल वेल-बीईंग इंडेक्स’नुसार ग्राहकांचा एकूण दृष्टिकोन सकारात्मक आहे.आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ‘फ्युचर एक्स्पेक्टे शन्स इंडेक्स’ ५९ इतका असून, भविष्यातील आर्थिक प्रगतीबाबतचा विश्वास कायम आहे.५७% प्रतिसादकर्त्यांनी या वर्षी उत्पन्न वाढल्याचे सांगितल्यामुळे (गेल्या वर्षी हे प्रमाण ५२% होते) आणि हळूहळू वाढणाऱ्या बचतीमुळे अधिक हा आ शावाद दृढ झाला आहे. एकूण,७४% ग्राहकांना वाटते की पुढील पाच वर्षांत आपली आर्थिक उद्दिष्टे गाठता येतील, तर ७६% जणांना पुढील काळात स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी घसरण दिसून येत असली, तरी हा वर्ग अजूनही खंबीरपणे पुढे जात आहे.

Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

“सर, माझं ब्रेकअप झालंय...” Gen Z कर्मचाऱ्याचा ईमेल सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये सुट्टीसाठी ईमेल लिहिणं ही रोजचीच बाब असते. पण अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०