Gold Silver Rate: सीजफायरनंतर सोन्याचांदीत प्रचंड घसरण! गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची सुवर्णसंधी 'इतक्याने' झाली दर कपात

प्रतिनिधी: इस्त्राईल व इराण युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिझफायर (युद्धबंदी) जाहीर केल्याने बाजाराचा नक्षा बदलला होता. त्याचप्रमाणे प्रचंड प्रमाणात सोन्याचांदीत घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार सकाळपर्यंत २४ कॅरेट सोने प्रति ग्रॅम दरात ८२ रूपयांनी घसरण झाल्याने प्रति ग्रॅम किंमत ९९८७ रुपयांवर पोहोचली आहे. तर २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ८२० रुपयांनी घसरण ९९८७० रुपयांवर पोहोचली आहे. तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७५ रूपयांनी घसरत ९१५५ रूपयांवर पोहोचले आहे तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ७५० रुपयांनी घसरत ९१५५० रूपयांवर पोहोचली आहे.

१८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ६१ रूपयांनी घसरत ७४९१ रुपयांवर पोहोचली आहे तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ६१० रूपयांनी घसरत ७४९१० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईसह पुण्यात २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९९८७ रुपयांवर व २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९१५५ रूपयांवर आहे. वरील किंमतीत जीएसटी व कर समाविष्ट नाहीत. सर्वाधिक किंमत दिल्लीत असून २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर १०००२ रूपयांवर पोहोचला असला तरी बहुतांश ठिकाणच्या सराफाबाजारात सोन्याची पातळी ९९८७ रूपयांवर पोहोचली आहे.

आज गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) मध्ये ०.९६% घसरण झाली आहे.भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याची निर्देशांकात १.२३% घसरण झाली असल्याने सोने किंमत ९८१७० रूपयांवर स्थिरावली आहे.

चांदीतही मोठी घसरण !

चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या प्रति ग्रॅम किंमतीत १ रूपयाने घसरण झाल्याने १ किलोच्या किंमतीत १००० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति किलो चांदीची किंमत ११०००० वरून घसरत १०९००० रूपयांवर पो होचली आहे. एमसीएक्सवरील चांदीच्या निर्देशांकात ०.७३% घसरण झाल्याने चांदीची पातळी १०५९७७ रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या फ्युचर निर्देशांकात ०.१४% घसरण झाली असल्याने चांदीचा दर वैश्विक बाजारात ३६.१३८ डॉलर्सव र पोहोचली आहे. चांदीच्या किंमतीतही मागणीत घट झाल्याने व डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ झाल्याने प्रामुख्याने चांदी व सोन्याचा बेस तयार करण्यास मदत झाली आहे.

याशिवाय युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याची आशा गुंतवणूकदारांना असल्याने बाजारातील सोन्याचांदीवरील दबाव कमी झाला आहे.
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या