वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटणाऱ्या उद्योजकाला मृत्यूने वळसा घालून दिले जीवनदान !

  105

श्रीगोंदा : मानवतेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून सदैव समाजासाठी कार्य करणाऱ्या राजापूर (मंगलवाडी) येथील युवा उद्योजक युनूस भाई शेख यांनी यावर्षी पंढरीच्या वाटेवर असलेल्या श्री संत विठ्ठल बाबा पायी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना मोफत रेनकोट वाटप केले.


या त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा होत असतानाच काही दिवसांपूर्वी नगर-दौंड महामार्गावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला तरी देवाच्या कृपेने शेख हे मात्र अगदी सुखरूप बचावले आणि ग्रामस्थांमध्ये ही घटना चमत्कार मानली जात आहे.मी जीवनात कधीच जात, धर्म, पंथ पाहिला नाही. कोणतीही मदतीची संधी आली तर मनापासून, सढळ हाताने ती केली. आजवर मंदिरांच्या जीर्णोद्धारात, सामाजिक- शैक्षणिक,धार्मिक उपक्रमात मी सहभाग घेतला.


बहुधा याच पुण्याईमुळे मी अपघातातून वाचलो," अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. त्यांच्या या विनम्रतेने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.युनूस भाई शेख हे व्यवसायाने रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ‘आजमेरा प्लास्टिक’ कंपनीचे यशस्वी उद्योजक असले तरी गावाकडील कोणत्याही मंदिराचा जीर्णोद्धार, धार्मिक कार्यक्रम असो किंवा शैक्षणिक उपक्रम ते मदतीस कायम पुढे असतात. वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी रेनकोट वाटप केले. प्रत्येक ठिकाणी सरळ हाताने मदत केली. साधी राहणी उच्च विचार हे ब्रीद वाक्य घेऊन जीवन जगत असताना आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या कृतज्ञ भावनेतून नेहमीच सत्कार्य करीत राहिलो. त्याचीच पोचपावती म्हणून मला भीषण अपघातातून सुखरूप वाचवले असल्याचे मत युनुसभाई शेख यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.