भाईजानच्या आरोग्याचा खुलासा : मेंदूचे गंभीर आजार आणि लढण्याची जिद्द

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान. त्याच्या फिटनेस आणि अ‍ॅक्शन सीनमुळे तो लाखो तरुणांचा आदर्श आहे. मात्र नुकत्याच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सलमाननं आपल्या आरोग्याबाबत धक्कादायक खुलासा केलाय. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन या तीन गंभीर आजारांशी तो झुंजत आहे. हे आजार नेमके काय आहेत? त्यांची लक्षणं आणि उपचार कसे होतात? चला, जाणून घेऊयात या खास लेखामधून.


अनेक तरुण-तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला भाईजान अर्थात सलमान खान याने चाहत्यांची झोप उडवलीय. ५९ वर्षीय सलमान खानने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आपल्या गंभीर आजारांची माहिती दिली. त्याच्या या खुलाशाने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन या आजारांमुळे त्याला तीव्र वेदना सहन कराव्या लागताहेत, मात्र त्याने काम करणं सोडलं नाही. सलमानच्या या धैर्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.


जाणून घ्या या तिन्ही गंभीर आजारांबाबत



ब्रेन एन्युरिझम, ज्याला सेरेब्रल एन्युरिझम असंही म्हणतात. हा एक जीवघेणा आजार आहे. याला ‘सायलेंट किलर’ ही म्हटलं जातं. कारण या आजाराची लक्षणं अनेकदा दिसत नाहीत. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड स्ट्रोकनुसार, मेंदूतील रक्तवाहिनी कमकुवत होऊन फुगते. हा फुगा फुटला तर मेंदूत रक्तस्त्राव होऊ शकतो. ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो.



काय आहेत ब्रेन एन्युरिझमची लक्षणं 


अचानक तीव्र डोकेदुखी, दृष्टी बदलणं, अंधुक दिसणं, मळमळ, उलट्या, मानदुखी, बेशुद्ध पडणं. उच्च रक्तदाब, धूम्रपान किंवा अनुवंशिक कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. ब्रेन एन्युरिझमवर शस्त्रक्रिया किंवा कॉइलिंगद्वारे उपचार केले जातात.



आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन आजार म्हणजे काय आणि त्याची लक्षणं.


आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन म्हणजेच AVM. या आजारामुळे मेंदूतील धमण्या आणि शिरा गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. हा आजार बहुतेकदा जन्मजात असतो, मात्र त्याची लक्षणं अनेकदा प्रौढ वयात दिसतात. डोकेदुखी, झटके येणं, हातापायात अशक्तपणा किंवा बधीरपणा येणं, संतुलन बिघडणं, बोलण्यात अडचण येणं, स्मरणशक्ती कमी होणं अशी या आजाराची लक्षणं आहेत. यावर शस्त्रक्रिया, रेडिओसर्जरी किंवा एम्बोलायझेशनद्वारे उपचार करता येतात.



ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजाराबाबत


ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ज्याला टिक डौलोरेक्स असंही म्हणतात. या आजारात तीव्र वेदना होतात. चेहऱ्याच्या ट्रायजेमिनल नर्व्हवर दबाव येतो. त्यामुळे विजेचा झटका बसल्यासारख्या असह्य अशा वेदना होतात. चेहऱ्याच्या एका बाजूला तीव्र, टोचणारी वेदना, विजेचा झटका किंवा जळजळ होणं, बोलणं किंवा स्पर्शाने वेदना वाढणं, डोळे किंवा गालात बधीरपणा येणं ही या आजाराची लक्षणं आहेत. या आजारावर औषधे, इंजेक्शन्स किंवा मायक्रोव्हॅस्क्युलर डीकंप्रेशन शस्त्रक्रियेद्वारे उपचार होऊ शकतात. ब्रेन एन्युरिझम आणि AVM साठी नियमित तपासणी आणि शस्त्रक्रिया आवश्यक असते. ट्रायजेमिनल न्यूराल्जियावर औषधं आणि शस्त्रक्रिया प्रभावी ठरतात. सलमान खान या तिन्ही आजारांशी झुंजत आहे. जीवघेणे आजार असतानाही त्याने शुटिंग सुरू ठेवलंय. त्याच्या या जिद्दीमुळे तो आजही चाहत्यांचा लाडका भाईजान ठरत आहे.

Comments
Add Comment

Navratri 2025 : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ,जाणून घ्या नवरात्र व्रताचा इतिहास, महत्त्व

मुंबई: सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ।। अर्थ : सर्व

दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त मुंबई (प्रतिनिधी) : खजूर, बदाम, पिस्ता हे खाण श्रीमंतीचे

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

सातही धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरल्याने

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती - मुख्यमंत्री

मुंबई : देशात उद्या, दि. 22 सप्टेंबर पासून दुसऱ्या टप्प्याचे वस्तू व सेवा कर सुधारणा लागू होत असून, या सुधारणा

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज

मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची