Adani Ports: अदानी पोर्टस शेअर्समध्ये ४ टक्क्याने उसळी! किंमत वाढण्याच्या मागे 'ही' कारणे !

प्रतिनिधी: इराण- इस्त्राईल यांच्यातील युद्धबंदी (Ceasefire) मुळे अदानी पोर्टस व स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) लिमिटेड कंपनीच्या समभाग (Share) सकाळी ४% उसळला होता. प्रामुख्याने २४ तासांत युद्धबंदीचा परिणाम भारतीय, आशियाई, तसेच युएस बाजारात दिसत आहे. याच धर्तीवर अदानी पोर्टसच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अदानी समुहाची मध्यपूर्वेकडील विशेषतः इस्त्राईलमध्ये बलाढ्य गुंतवणूक आहे.अदानी समुहाचा हानिफा पोर्ट (Hanifa Port) येथे मोठी गुंतवणूक होती. आता सिझफायरमुळे वैश्विक बाजाराने मंदीतून बाहेर येत सकाळी मोठी रॅली घेतली होती.

याशिवाय अदानी समुहाने जानेवारी २०२३ मध्ये, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ने इस्रायलच्या गॅडोट ग्रुपसोबत हैफा पोर्ट कंपनीमधील ७०% हिस्सा (Stake) खरेदी केला होता. देशातील बंदर पायाभूत सुविधांचे खाजगीकरण (Infrastructure Privatisation) करण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जुलै २०२२ मध्ये अदानी समुहाने इस्रायली सरकारची निविदा (Tender) जिंकली होती.

याखेरीज आज दिवसभरात अदानी समुहाचे शेअर्स मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहेत. विशेषतः अदानी एंटरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्टस या समभागात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सकाळच्या सत्रात तर अदानी पोर्टस समभागात ५% वाढ झाल्याने शेअरची किंमत १४१८.४५ रूपयावर पोहोचली होती. अदानी समुहाच्या इतर कंपन्यांच्या समभागातही १% हून अधिक वाढ झाली होती.

इराण व इस्त्राईल युद्धामुळे अदानी समुहाला विशेषतः अदानी पोर्टस ला नुकसान झाले होते. मात्र अदानी समुहाने निवेदनात म्हटले होते की, आमच्या प्रकल्पाला कुठलेही नुकसान पोहोचले नाही.

याशिवाय नुकत्याच झालेल्या आर्थिक वर्ष २०२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मध्ये समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या वक्तव्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आशावाद निर्माण झाला, त्याप्रसंगी अदानी यांना म्हटले होते की,समूह पुढील पाच वर्षांत विविध व्यवसायांमध्ये दरवर्षी १५ अब्ज ते २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. त्यांनी स्वच्छ ऊर्जा आणि वायू क्षेत्रातील कामगिरीवरही प्रकाश टाकला, अदानी टोटल गॅस आता १० लाख पीएनजी ग्राहकांना सेवा देते आणि २२ राज्यांमध्ये ३,४०० ईव्ही चार्जिंग स्टेशन चालवते हे नमूद केले. बैठकीदरम्यान, त्यांनी स्वच्छ ऊर्जा आणि वायू क्षेत्रातील कामगिरीवरत प्रकाश टाकत म्हटले आहे की,'अदानी टोटल गॅस आता १० लाख पीएनजी ग्राहकांना सेवा देते आणि २२ राज्यांमध्ये ३,४०० ईव्ही चार्जिंग स्टेशन चालवते.'
Comments
Add Comment

गुवाहाटीत मध्यरात्री झालेल्या अपघातात अभिनेता आशिष विद्यार्थी आणि पत्नी जखमी

गुवाहाटी: बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ हे शुक्रवारी रात्री गुवाहाटीतील झू रोड

अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी पहिल्यांदाच एकत्र, ‘ओह माय गॉड ३' मध्ये प्रमुख भूमिका

मुंबई: २०२६ मध्ये अभिनेता अक्षय कुमार विविध मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जॉली

शाहरुख खानच्या या निर्णयामुळे देशभरात वाद; राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या टोकाच्या प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका निर्णयामुळे देशभरातून

KBC १७ सीझनचा प्रवास संपला ,अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांत पाणी

मुंबई: २००० साली सुरू झालेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो आजही तितकाच लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांत या

रिंकू राजगुरूच्या धमकेदार लावणीने वेधल प्रेक्षकांच लक्ष..

मुंबई : सैराट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आणि सध्या आशा या चित्रपटून चर्चेत असणारी अशी

दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण