इस्रायलमधून मायदेशी परतले ५९४ भारतीय

नवी दिल्ली : इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी इस्रायलमधून ५४९ भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाची तीन विमाने नवी दिल्लीत पोहोचली. पहिल्या विमानात १६१, दुसऱ्या विमानात १६५ आणि तिसऱ्या विमानात २६८ भारतीय नागरिकांना आणण्यात आले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री (एमओएस) पवित्रा मार्गेरिटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले. परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले की ऑपरेशन सिंधूचा इस्रायल टप्पा २३ जून २०२५ रोजी सुरू झाला. यामध्ये १६१ भारतीय नागरिकांची पहिली तुकडी जॉर्डनमधून मायदेशी परत आणण्यात आली. त्यानंतर, हवाई दलाच्या सी-१७ विमानाने इस्रायलमधून १६५ प्रवाशांना परत आणले. मंगळवारी दुपारी २६८ नागरिकांना घेऊन तिसरे विमान भारतात पोहोचले. मशहादहून नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या एका विशेष विमानाने २९२ भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत इराणमधून २२९५ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे
Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे