RBI Digital Fraud: Digital Frauds रोखण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय! आता बँक DPIP विकसित करणार

प्रतिनिधी: वाढत्या सायबर घोटाळे,डिजिटल पेमेंट घोटाळे (Digital Fraud) यांना आळा घालण्यासाठी आरबीआयने (Reserve Bank of India) मोठे पाऊल उचलले आहे. या हल्ल्यापासून व्यवहार सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी बँकेने आता डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (Digital Payment Intelligence Platform DPIP) विकसित करण्यासाठी ठरवले आहे. आरबीआयच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा काम करणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अथवा घरगुती व्यवहारावर सततचा धोका रेंगाळत असल्याने या समस्येवर घाला घालण्यासाठी आरबीआयचा हा उपक्रम असणार आहे.प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी व पब्लिक सेक्टर या दोन्ही क्षेत्रांच्या संयोगातून हे व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. सध्या मोठ्या वेगात वाढलेल्या डिजिटल घोटाळ्यांचे नियत्रंण करण्यासाठी तसेच संशयास्पद व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी या व्यासपीठाचा आरबीआयला उपयोग होऊ शकतो. किंबहुना यातून गुंतवणूकदारांना अथवा नागरिकांना आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला या संदर्भातील उच्च दर्जात्मक बैठकीला आरबीआयचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे व्यासपीठ काही महिन्यांतच सुरू व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे आरबीआयच्या सुत्रांनी सांगितले आहे.या व्यासपीठामु ळे सायबर सुरक्षा चांगल्या दर्जाची मिळू शकते. कुठल्या विषयावर डेटाचे संरक्षण, माहिती चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच इतर व्यवहारावर बारकाईने लक्ष हे व्यासपीठ ठेऊ शकणार आहे.

माहितीप्रमाणे, ५ ते १० बँका या उपक्रमासाठी एकत्र येणार असून एकत्र पद्धतीने प्रोटो टाईप (Prototype) विकसित करणार आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान‌‌‌ छोट्या मोठ्या सगळ्या संशयी व्यवहारावर लक्ष ठेवून असू शकतात. आरबीआयने मागील वर्षीच शक्तीकांता दास गव्हर्नर असताना एनपीसीआय (National Payment Corporation of India NPCI) माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ए पी होटा यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी समिती नेमली होती त्याला आता बँकेकडून मोहोर लागली आहे.इंटरनेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट युजर इंटरफेस अशा विविध सोयींचा देखरेखीसाठी हे नवे व्यासपीठ काम करणार आहे असे बँकेने यावेळी स्पष्ट केले होते.
Comments
Add Comment

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण