PropEquity : जून-एप्रिल तिमाहीत घरांच्या विक्रीत १९% घट, सर्वाधिक घट ठाणे, मुंबईत!

प्रतिनिधी: प्रॉपइक्विटी(PropEquity) या कंपनीने घरांच्या विक्रीबाबत एक नुकताच अहवार सादर केला आहे. या अहवालातील माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एप्रिल ते जून महिन्यात देशभरातील घरांच्या मागणीत १९% मोठी घट घसरू शकते असे अहवालात नमूद केले गेले आहे. भारतातील प्रमुख ९ महत्वाच्या शहरात एकूण विक्रीत ९४८६४ युनिट्सवर घसरण आली आहे.


या अहवालावर प्रतिक्रिया देताना प्रॉपइक्विटीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर जसुजा म्हणाले की, प्रॉपइक्विटीचे संस्थापक आणि सीईओ समीर जसुजा म्हणाले, '२०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) घरांची विक्री १ लाख युनिटच्या खाली घसरल्याची ही पहिलीच वेळ आहे. सलग चौथ्या तिमाहीत पुरवठा देखील १ लाख युनिटच्या खाली राहिला आहे '.


रिपोर्टमधील माहितीनुसार, या आर्थिक वर्षातील तिमाहीत घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत १९ टक्के घट होऊ शकते. मागील वर्षी याच दुसऱ्या तिमाहीत ११६४३२ युनिट्सची विक्री झाली होती ती विक्री घटत यावर्षी तिमाहीत ९४८६४ युनिट्सपर्यंतच विक्री होईल अशी अपेक्षा रिपोर्टमध्ये व्यक्त केली आहे.


अहवालानुसार,घरांच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. वर्षानुवर्षे बेसिसवर या दुसऱ्या तिमाहीत घरांच्या सप्लायमध्ये ३०% घट होऊ शकते. डेटानुसार बंगलोर शहरात ६% घसरण होण्याची शक्यता आहे मागील वर्षी तिमाहीत बंगलोरमध्ये १५५८२ घरांची विक्री झाली ती या वर्षाच्या तिमाहीत घसरुन १४६७६ युनिट्सवर गेली.


आकडेवारीनुसार,विशेषतः मुंबई,नवी मुंबईतही घसरण होण्याची आहे. मुंबईतील घरांच्या विक्रीतही थेट ३४% घट होत मागील वर्षीच्या १२११४ युनिट्स तुलनेत ८००६ युनिट्सची विक्री अपेक्षित आहे. नवी मुंबईत इयर ऑन इयर बेसिसवर या तिमाहीत १७% घसरण अपेक्षित आहे जी मागील तिमाहीत ८२२४ युनिट्स होती.


ठाणे, पुणे शहरातही हा ट्रेंड कायम असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. ठाणे शहरात घरांच्या विक्रीत ३४% घसरण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मागील वर्षी तिमाहीत ठाण्यात २२५१२ युनिट्स विक्री झाली होती ती यावेळी घसरत १४८३२ घरावर जाण्याची शक्यता आहे. पुण्यात २७% घरविक्री घसरण अपेक्षित असून मागील तिमाहीतील २३४२९ युनिटसवरून घसरत या तिमाहीत १७१९६ युनिट्स विक्री होणे अपेक्षित असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.


केवळ दिल्ली एनसीआर,चेन्नई शहरात वाढ अपेक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे. दिल्लीत घरांच्या विक्रीत १६% तर चेन्नईत ९% वाढ अपेक्षित आहे. मागील तिमाहीत दिल्लीत १०११४ युनिट्स तुलनेत या तिमाहीत ११७०३ युनिट्सची वि क्री अपेक्षित आहे तर चेन्नईत मागील तिमाहीतील ४९२७ युनिट्समधील तुलनेत या तिमाहीत ५३५४ युनिट्सची विक्री अपेक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रॉपइक्विटी हे एक मोठे रिअल इस्टेट इंटेलिजन्स व्यासपीठ आहे. कंपनीकडे रिअल इस्टेट क्षेत्रातील १७ वर्षांचा रिअल टाईम डेटा उपलब्ध आहे तर कंपनी अहवालाशिवाय डेटा एनालिटिक्स सारख्या सुविधा देते. कंपनीच्या माहितीनुसार कंपनी ४० पेक्षा अधिक शहरांचा डेटा परिक्षण करते. एकंदरीत जागतिक बाजारा सह भारतीय बाजारातील घटलेली मागणी, घरांच्या वाढलेल्या किंमती त्यापातळीत कमी असणारे उत्पन्न अशा अनेक गोष्टीमुळे घरांच्या विक्रीत घट झाली आहे.

Comments
Add Comment

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत.

‘एमआयएम’चे तेलंगणात ६७, तर महाराष्ट्रात शंभरहून अधिक नगरसेवक…

मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक

मुंबई महापालिकेत महिला नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत!

२२७ प्रभागांमध्ये १३० नगरसेविका विजयी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण

मुंबईत ८७ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

मुंबई महापालिकेत पाचव्या क्रमाकांवर नोटाला मतदान मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा अनेक

महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेतच खरी चुरस!

महापौरांच्या खुर्चीवर पिठासिन अधिकारी म्हणून श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा मुंबई : महापौरपदाचे आरक्षण