प्रार्थना बेहरेच्या पायाला मोठी दुखापत: गुडघ्याची शस्त्रक्रिया, काही आठवड्यांसाठी बेड रेस्ट

मुंबई: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेला मोठी दुखापत झाली असून तिच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रार्थनाने सोशल मीडियावर याबद्दल माहिती देणारी पोस्ट शेअर केली असून, तिच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत आहेत.



प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शस्त्रक्रियेनंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती सध्या बेड रेस्टवर असून, "पुढील काही आठवड्यांसाठी असा व्ह्यू असेल..कोणतीही तक्रार नाही! 'Knee ligament surgery' (गुडघ्याच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया)" असे कॅप्शन तिने दिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी 'काळजी घे' अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांसाठी प्रार्थनाला पूर्णपणे आराम करावा लागणार आहे.

प्रार्थना बेहरे तिच्या सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी ओळखली जाते आणि ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत वैयक्तिक आणि व्यावसायिक अपडेट्स शेअर करत असते. तिच्या या दुखापतीमुळे चाहत्यांना थोडा धक्का बसला आहे.

आगामी प्रोजेक्ट आणि वर्क फ्रंट:

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, प्रार्थना बेहरे लवकरच तिच्या पतीने, म्हणजेच अभिषेक जावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु ७ मे २०२५ रोजी प्रार्थनाने सोशल मीडियावर या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती.

यापूर्वी प्रार्थना प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बुम' या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत प्राजक्ता माळी, स्वप्नील जोशी, वनिता खरात यांसारखे कलाकारही होते. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 'माझी तुझी रेशीमगाठ', 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये प्रार्थनाने काम केले आहे.
Comments
Add Comment

इन्स्टा स्टार मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार ?

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यातच उमेदवार म्हणून मिथिलामधून

आधी साठ कोटी जमा करा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दोघांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा

'दशावतार' चित्रपटाचे रिषभ शेट्टीने केले कौतुक! म्हणाला, असे चित्रपट पुढील पिढीसाठी दस्ताऐवज आहेत

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी सध्या आपल्या कांतारा चॅप्टर १ या नवीन चित्रपटामुळे

रेणुका शहाणेचा ५९ वा वाढदिवस, दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा!

मुंबई : सलमान खानसोबत पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी मराठी

कांतारा चॅप्टर १ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसात जबरदस्त कमाई

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास, ओटीटीवर स्त्रीशक्तीचा उत्सव

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास – नवरात्रीत मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीशक्तीच्या नऊ रूपांचा अल्ट्रा झकास ओटीटीवर