सेन्सेक्स बँक (Sensex Bank) निर्देशांकात २३७.८६ अंकांनी घसरण झाली आहे तर बँक निफ्टीत १९३.५० अंकाने घसरण झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२०%, ०.५७% वाढला आहे तर निफ्टी मिडकॅप व स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे ०.३९%, ०.३६% वाढ झाली आहे. आज प्रामुख्याने मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या जवळपास ०.५०% झालेल्या वाढीमुळे बाजारात सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Ind ices) यामध्ये गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद राहिला आहे. आज सकाळप्रमाणेच मिडिया (४.३९%) तेजीत राहिला असून याशिवाय मेटल (०.६६%), फार्मा (०.०६%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.८२%), मिडस्मॉलकॅप फायनांशियल सर्विसेस (१.०६%) या समभागात वाढ राहिली होती. तर नुकसान ऑटो (०.९२%), एफएमसीजी (०.७४%), फायनांशियल सर्विसेस (०.२०%), हेल्थकेअर (०.२१%) या समभागात सर्वाधिक घसरण झाली.
अखेरच्या सत्रात शेअर बाजारातील वीआयएक्सची (Indian Volatility Index VIX) या अस्थिरता निर्देशांकाची पातळी २.७४% उसळली होती. सकाळच्या सत्रात वीआयएक्स हा ४.५५% पातळीवर होता. सत्र संपताना निम्याहून अधिक घसरण वीआयएक्समध्ये आल्यानंतर बाजारात काही प्रमाणात स्थिरता येण्यास मदत झाली.
आज बेंचमार्क निर्देशांकात घसरण कायम असली तरी बीएसई (BSE) मधील ४२४० कंपनीच्या समभागापैकी १८६२ समभागात वाढ झाली तर २१९८ समभागात घसरण कायम आहे. एनएसई (NSE) मध्ये २९९४ कंपनीच्या समभागापैकी १३६४ समभागात वाढ झाली असून उर्वरित १५४४ समभागात घसरण कायम राहिली आहे. आज दिवसभरात बीएसईत २८४ समभाग लोअर सर्किटवर राहिले असून एनएसईत १०१ समभाग लोअर सर्किटवर कायम होते. तसेच निफ्टी कॉल पूटमध्ये गुणोत्तर तर १४०.५० बेसिसने घसरले.
आज सकाळी गिफ्ट निफ्टीत २०० अंकांने पडझड झाल्यानंतर बाजारात मंदीचे सावट कायम होते. मध्यपूर्वेकडील तुंबळ युद्धामुळे बाजाराचे कंबरडे मोडले जाईल अशी आशा सर्वसाधारण गुंतवणूकदारांना होती. मात्र तज्ञांनी सकाळीच मांड लेल्या मतानुसार, आंतरराष्ट्रीय दबावाला भारतीय बाजारातील मजबूत 'फंडामेंटल' कामी येईल अशा आशयाचे भाष्य केले होते. त्याचप्रमाणे अंतिमतः घरगुती गुंतवणूकदारांनी बाजारात दाखवलेल्या विश्वासामुळे वाताहात होण्यापासून बाजा राला रोखले गेले.
युएसने इराणच्या परमाणू केंद्रावर केलेल्या हल्ल्यानंतर जग तिसऱ्या महायुद्धाकडे ढकलले जात आहे का अशा आशयाच्या वावड्या उठण्यास सुरूवात झाली होती.परिणामी आशियाई व अमेरिकन बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसा न झाले होते. आजही जागतिक बाजारपेठेत युएसमध्ये उघडतानाच डाऊ जोन्स (Dow Jones), एस अँड पी ५०० (S &P 500) मध्ये ०.२२% व नासडाक (NASDAQ) मध्ये ०.५१% घसरण झाली आहे.
काल इस्त्राईलमधील ११ शहरांना इराणने लक्ष्य केल्यानंतर युद्ध चिघळले. अमेरिकेने युद्धात उडी मारल्यानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान नेत्यनाहू यांनी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. याशिवाय इराणने परमाणू बॉम्बची धमकी देत तीव्र प्रतिउत्तर अमेरिका व इस्त्राईलला देण्याचे म्हटले होते.इराण सर्वेसर्वा खोमानी यांनी तेलाचा पुरवठा बंद करण्याचे जाहीर करताच बाजारात अस्थिरता कायम होती. परिणामी सकाळी झालेली १ ते २ टक्के कच्च्या तेलात झालेली वाढ असताना संध्याकाळपर्यंत तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.७०% वाढ तर Brent Future Index यामध्ये ०.७८% वाढ झाली. परिणामी अजूनही दरवाढीचा धोका कायम आहे. संध्याकाळपर्यंत कच्चे तेल प्रति बॅरेल ७४.४२ डॉलर्स म्ह णजेच जवळपास ७५ डॉलरवर पोहोचल्याने जागतिक पातळीवर तेलाच्या किंमतीबाबत चिंता कायम आहे.
दुसरीकडे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ होत असताना जागतिक मागणीत झालेल्या घटीमुळे सोन्याचांदीचे दर घसरले. परिणामी सोने प्रति तोळा ६० रूपयांनी घसरले तर चांदी प्रति किलो चांदीची किंमतीत किरकोळ घसरण झाली होती. आज रूपयांच्या तुलनेत डॉलरमध्ये वाढ झाली होती. डॉलरच्या तुलनेत रूपया १७ पैसै घसरला होता.डॉलर निर्देशांक जवळजवळ अर्धा टक्क्यांनी वाढला, ज्यामुळे शेअर बाजाराच्या भावनांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. मजबूत डॉलर मुळे परकीय भांडवल बाहेर जाण्याचा धोका वाढतो. विशेषतः अशा वेळी जेव्हा भू-राजकीय तणावा मुळे धोकादायक इक्विटी कमी आकर्षक होतात आणि अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित-निवासी मालमत्तेकडे वेळोवेळी वळत अस तात.
रिझर्व्ह बँकेने केलेल्या सुधारणांमुळे मागील आठवड्यात काही काळासाठी बाजारात तेजी जाणवली होती. मात्र पुन्हा बाजारातील अस्थिरता बँक निफ्टीसाठी मारक ठरत आहे. अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात न झा ल्याने आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. परिणामी बँक निर्देशांक सुस्त झाल्याचे दिसून येते. एकूणच बाजारातील स्थिती पाहता गुंतवणूकदारांना तेलाच्या स्थितीकडे लक्ष ठे वणे महत्त्वाचे ठरू शकते. बाजारातील तज्ञांच्या मते, आगामी काळात इराणने तेलाचा पुरवठा बंद केल्याने तेलाच्या किंमती ८० डॉलर्सवर जाऊ शकतात. तसे झाल्यास त्याचा मोठा फटका तेल कंपन्यांना बसू शकतो.
अखेरच्या सत्रात वाढ झी एंटरटेनमेंट (१२.४६%),सीपीसीएल (१०.९६%), एमआरपीएल (७.९३%), किर्लोस्कर ब्रदर्स (६.७४%), गार्डन रिच (६.२४%), पुनावाला फिनकॉर्प (५.४६%),लिंडे इंडिया (५.२८%),झेन टेक्नॉलॉजी (५.००% ),भारत इलेक्ट्रॉनिक (३.०१%), ट्रेंट (३.७७%),आयआरएफसी (IRFC) (२.०७%) ,हॅवेल्स इंडिया (१.९३%), हिंदाल्को (१.८९%), चोलामंडलम फायनान्स (१.८६%), जेल इंडिया (१.६०%), अदानी पॉवर (१.४६%), इंटरग्लोब एव्हिएशन (१. ४३%), बजाज फायनान्स (१.१६%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.११%),अदानी एनर्जी (१.१०%) या समभागात वाढ झाली आहे.
तर सर्वाधिक घसरण एलटी फूड (६.०३%), ओला इलेक्ट्रिक (५.९७%), गोदरेज इंडस्ट्रीज (५.०१%), सिमेन्स (३.८१%), युनायटेड स्पिरीट (२.६८%), इन्फोसिस (२.४०%), लार्सन ट्युब्रो (२.१४%), एचसीएल टेक्नॉलॉजी (२.११%), गो डिजिट जनरल (२.८८%), युको बँक (२.०४%), एनटीपीसी ग्रीन (१.७७%), महिंद्रा अँड महिंद्रा (१.५५%), गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट (१.५५%), इन्फोएज (१.५२%) , टीसीएस (१.२३%), टीव्हीएस (१.१९%), बजाज होल्डिंग (१.१४%), बजाज ऑटो (१.०१%), एशियन पेंटस (०.९५%), आयसीआयसीआय प्रोडुंशियल (०.८५%), एचडीएफसी बँक (०.८३%), अपोलो (०.७९%) या समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'आठवड्याची बाजाराची सुरवात अपेक्षेप्रमाणे 700 पाॅईंट खाली ओपन झाली.अमेरिका प्रत्यक्ष युद्धात उतरल्यामुळे भीतीचे वातावरण अधिक गड द झाले आहे.आज संपुर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे.व त्यामुळेच सावध पवित्र्यात जगातील सर्व शेअर बाजार आहेत. कच्चे तेल आज तरी 73 डाॅलर च्या जवळपास आहैत. सगळ्याच स्थरावर युद्धाने स्टँड स्टील परीस्थिती झाली आ हे. अमेरिका प्रत्यक्ष युद्धात असल्यामुळे कच्चे तेलावर नियंत्रण ठेवेल असे वाटते. इतर अनेक देश यात सामील होतात का याकडे सर्व लक्ष लागलं आहे. बाजारातील सुरवातीची ७०० पाॅईंट ची पडझड शेवटी शाॅर्ट कवरींगने चांगलीच रिकवरी झाली आहे.निफ्टी तही किरकोळ मुहमेंट आहे.थोडीथोडी अस्थिरता वाढणार आहे का कमी होणार आहे हे लवकरच कळेल.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'अमेरिकेने इराणच्या अणु सुविधांवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे आठवड्याच्या शेवटी निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे मध्य पूर्वेतील तेलाच्या किमती आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली होती. तथापि, बाजारांनी दिवसाच्या आत जोरदार सुधारणा केली, सुरुवातीच्या काळात झालेल्या तोट्यातून बाहेर पडून ब्रेंट क्रूड उच्चांकावरून खाली आला, जागतिक जोखीम भावना स्थिर झा ली आणि अस्थिरता कमी राहिली.निफ्टी ५० सुरुवातीच्या तासात कमकुवत आणि विस्तारित तोटा झाला, २४,८२४ च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. तथापि, एक मजबूत पुलबॅक रॅली झाली, निर्देशांक दिवसाच्या खालच्या पातळी पासू न २०० पेक्षा जास्त अंकांनी वर आला आणि २५,०५७ च्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श केला आणि नंतर २४,९७१.९० वर स्थिरावला - बंद आधारावर १४०.५० अंकांनी किंवा ०.५६% ने खाली.
क्षेत्रीय कामगिरी मिश्रित होती: आयटी,एफएमसीजी,ऑटो आणि बँकिंग निर्देशांक दबावाखाली राहिले, ०.५% ते १.५% पर्यंत घसरले, तर मिडिया,मेटल आणि कंझ्युमर ड्युरेबल्स यांनी चांगली कामगिरी केली, ०.५% ते ४% च्या श्रेणीत वाढ झाली. व्यापक बाजारपेठेत लवचिकता दिसून आली, निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० यांनी बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली आणि अनुक्रमे ०.३६% आणि ०.७० % ने वाढ झाली.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'निर्देशांकाने उच्च लाट मेणबत्ती (High Wave Candle) तयार केली जी मागील सत्राच्या किंमत श्रेणीमध्ये बंद राहिली, जी भू-राजकीय तणावात वाढ झाल्यामुळे एकत्री करणाचे (Consolidation) संकेत देत होती.आजच्या सत्रात स्टॉक विशिष्ट कृती फोकसमध्ये राहिली. पुढे जाऊन, निर्देशांक सकारात्मक पूर्वाग्रह राखेल आणि येत्या सत्रांमध्ये हळूहळू २५,२००-२५,२५० पातळीकडे जाई ल, जो गेल्या पाच आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणीचा वरचा बँड असेल. २४,७००-२४,८०० पातळींपेक्षा तात्काळ पूर्वाग्रह सकारात्मक राहील, जो गेल्या आठवड्यातील नीचांकी आणि २० दिवसांच्या EMA चा संगम असेल.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'बँक निफ्टीने एक बुल कॅन्डल तयार केला जो मागील सत्र किंमत श्रेणीमध्ये बंद राहिला, जो भू-राजकीय तणावात वाढ झाल्यामुळे एकत्रीकरणाचे संकेत देतो. पुढे जाऊन, निर्देशांक सकारात्मक पूर्वाग्रह राखेल आणि येत्या आठवड्यात ५६,७०० आणि ५७,४०० पातळींकडे जाईल. तात्काळ पूर्वाग्रह ५५,४०० पातळींपेक्षा जास्त सकारात्मक राहील, जो अलीकडील एकत्रीकरण क्षेत्राचा संगम आणि गेल्या आठवड्यातील नीचांकी आहे.दैनिक स्टोकास्टिक अपट्रेंडमध्ये राहतो, त्यामुळे सकारात्मक पूर्वाग्रह प्रमाणित होतो. मुख्य आधार ५४,५००-५४,००० पातळींवर ठेवला आहे, जो मागील वरच्या हालचालीच्या ५० दिवसांच्या EMA आणि प्रमुख रिट्रेसमेंट पातळीचा संगम आहे.'
बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की, 'कमकुवत भू-राजकीय भावनांमुळे सुरुवातीच्या घसरणीनंतर निफ्टी लक्षणीयरीत्या सावरला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे भारतीय बाजाराला सकाळच्या काही तोट्यातून बाहेर पडण्यास मदत झाली,जरी तो अजूनही नकारात्मक पातळीवर संपला. दिवसभरासाठी, निफ्टी २४,८५० च्या आधार पातळीच्या वर बंद झाला आणि जोपर्यंत निफ्टी या पात ळीच्या वर टिकून राहतो तोपर्यंत भारतीय शेअर बाजार खरेदीच्या संधी देत राहू शकतात. वरच्या बाजूस, जर तो २५,००० च्या वर गेला तर तो अल्पावधीत २५,३५० च्या दिशेने जाऊ शकतो.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की, 'गेल्या शुक्रवारी, अमेरिकेने इस्रायल-इराण संघर्षात सहभागी होण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत जाहीर केल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची अपेक्षा असलेल्या बाजारपेठांमध्ये तेजी दिसून आली. तथापि,आठवड्याच्या शेवटी इराणच्या अणु सुविधांवर अमेरिकेच्या अनपेक्षित हवाई हल्ल्यामुळे त्या अपेक्षा भंग झाल्या, ज्यामुळे कच्च्या ते लाच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि देशांतर्गत शेअर बाजारात एकत्रीकरण झाले. सुरुवातीच्या धक्क्यानंतरही, भांडवली वस्तू आणि धातूच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजाराने बहुतेक तोटा भरून काढला, कारण तेल पुरवठा ता त्काळ खंडित होण्याची भीती कमी राहिली. दरम्यान, जागतिक तंत्रज्ञान खर्चाभोवती अनिश्चिततेमुळे आयटी शेअर्सवर दबाव आला, जो अॅक्सेंचरने नोंदवलेल्या कमकुवत कमाईमुळे वाढला.'
एकूणच बाजारातील स्थिती पाहता तेलाच्या हालचालींशिवाय इतर क्षेत्रीय विशिष्ट समभागावर लक्ष ठेवणे उदया महत्त्वाचे ठरणार आहे.