E Bike Taxi in Maharashtra : महाराष्ट्रात ई-बाइक टॅक्सी सेवेला नागरिकांचा विरोध!

मुंबई : मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नियम तयार केले आहेत. मात्र, राज्य परिवहन विभागाने ई-बाइक टॅक्सी सेवेसाठी तयार केलेल्या नियमावलीवर नागरिकांनी ८५ सूचना-हरकती नोंदवल्या आहेत. त्यात ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करू नका, अशी मागणी करण्यात आली आहे. या हरकती-सूचना सरकारकडे पाठवल्या आहेत.



या नियमावलींवर ५ जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या. हरकतींपैकी १० संघटना, ८० हून अधिक नागरिकांनी हरकती नोंदविल्या. त्यात ही सेवा सुरू न करण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील १२ राज्यांमध्ये सध्या ही सेवा सुरू आहे. मात्र, कर्नाटकमध्ये काही अडचणींमुळे ती तात्पुरती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्यांतील अनुभवाचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नियम तयार केले आहेत. मात्र यावर ई-बाइक टॅक्सी सेवेला नागरिकांचा विरोधी दिसून येत आहे.


दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही या सेवेला विरोध केला आहे. त्यांच्या मते, या सेवेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतील, तसेच रिक्षाचालकांच्या रोजगारावरही गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ई-बाइक टॅक्सी सेवेला राज्यात नागरिकांचा वाढता विरोध पाहता यावर सूचना आणि हरकतींवर काय निर्णय घेण्यात येणार, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या