मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका! गंभीर आरोप करत 'या' नेत्याने सोडली साथ

"मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते, माझ्यावर हसत राहिले" केले अनेक आरोप


नागपूर: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीत गुंतलेल्या उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) ना मराठवाड्यातून मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे महत्वाचे शिलेदार डॉ. संजय लाखे पाटील (Dr . Sanjay Lakhe Patil)  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आपला शब्द पाळला नाही, असा आक्षेप लाखे पाटील यांनी घेतला. लाखे पाटील जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. परंतु, शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याचे त्यांनी म्हटले आहे.


संजय पाटील यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा हात सोडून उबाठात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आले. संजय पाटील म्हणाले की, "मला विधानसभा निवडणुकीत सांगलीऐवजी जालना येथून तिकीट देऊ, असे अश्वासन देण्यात आले. परंतु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यानी त्यांच्या वैयक्तिक अजेंडामुळे तसे होऊ दिले नाही. जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले."


अंबादास दानवेंवर टीका करताना पाटील म्हणाले की, "मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते. अंबादास दानवे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत होते, तेव्हा मला दौऱ्यापासून दूर ठेवले. कुठलीही जबाबदारी दिली नाही. मुळात मला कामाची संधी दिली नाही. मला कसे दूर ठेवले जाईल, हेच पाहिले गेले. संघटनात्मक कामापासून मला सातत्याने वगळण्यात आले. त्यामुळेच यापुढे मी ठाकरे गटात काम न करण्याचे ठरवले आहे."



राजीनामा पत्रात लाखेने काय लिहिले?


आपल्या राजीनामा पत्रात लाखे पाटील यांनी म्हटले आहे की, अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावत जिंकणारी जालना आपल्याकडे येणार नाही हा तिकडील 'शिष्यत्व धर्म' निभावला. विजयी जागा पदरात पाडून न घेता पक्षाला आणि मला ठेंगा दाखवला... आपल्या डोळ्यासमोर. त्यानंतर आपण मला सचिव पदाची जबाबदारी दिली पण गेल्या 13/14 महिन्यात वेळोवेळी विनंती करूनही कसलीच संघटनात्मक जबाबदारी आपण सोपवली तर नाहीच पण जिल्हा, विभाग, राज्य संघटनेतून मला हळूहळू संपूर्णतः बेदखल करण्यात आले. आपल्या मुखपत्रामध्ये कुठल्याही कार्यक्रमाच्या बातम्यात उपस्थित असूनही इतर सचिवासह माझे नाव येणार नाही ही रचना प्रस्थापित व्यवस्थेने ठरवून केली. आणि वाचून जाणकार मला हसत राहिले.  बातमीत नाव नाही तर पक्षात स्थान नाही असे सांगत राहिले.


Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को

ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं

'उद्धव ठाकरेंनी माझे हजार रुपये वाचवले' फडणवीसांची मार्मिक टिप्पणी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कात केलेल्या भाषणावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड: