केदारनाथहून परतल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरची तब्येत बिघडली

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ यात्रेला गेली होती. याचे फोटो शेअर करत तिने आपला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला होता. मात्र, आता केदारनाथहून परतल्यानंतर अमृताची तब्येत बिघडली आहे. सोशल मीडियावर याबाबत व्हिडीओ पोस्ट करत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे.


अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ पोस्ट शेअर करत चाहत्यांना खास सल्ला दिला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या हाताला सलाइनसह तेथे लावलेली पट्टी दिसत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते, "हॅलो, नमस्कार. तर मी काल केदारनाथहून परत आले आहे आणि आज मला हे झालं आहे. गेले दोन ते तीन दिवसांपासून मला बरं वाटत नाही आहे, त्रास होत आहे. पण डोलो गोळी खाऊन मी काम चालवत होते. केदारनाथला जाऊ इच्छिणाऱ्यांना मी हे सांगते की, समुद्राच्या उंचीपासून ११ हजार फुटावर हे देवस्थान आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला समजण्याची गरज आहे. तुम्ही तिथे जाणार असाल तर तिथल्या वातावरणाची आधी तुमच्या शरीराला सवय करुन घ्या. कारण माझ्या शरीराला तिथलं वातावरण पटकन सहन झालं नाही".


त्यानंतर पुढे ती म्हणाली, "जेव्हा मी खाली उतरत होते तेव्हा हालत खराब झाली. शेवटच्या चार किलोमीटरवर तर माझ्या पायाचे लचकेच पडले होते. अंगदुखी वगैरे आता कमी झालं आहे. पण मला माऊंटेन सिकनेस म्हणतात ना बहुतेक ते मला झालं आहे. तुम्हीही तिथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर सगळी औषधं घेऊन जा, ORS घेऊन जा. घाईगडबडीमध्ये ही ट्रीप करायला जाऊ नका. तिथे पोचल्यानंतर शांतपणे एक दिवस घालवा. तिथे फिरा, कॉफी प्या. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. दुसऱ्या दिवशी मग दर्शन घ्या"


दर्शनानंतर तिथे थांबा आणि नंतरच खाली उतरा. आम्ही नशिबवान आहोत की, आम्हाला पाऊस लागला नाही, कुठलीच दगदग झाली नाही. पण, तिथलं वातावरण वेगळंच आहे. समुद्रापासून इतक्या उंचीवर जाणं आणि तिथे गेल्यानंतर आपल्यासाठी ते अशक्य असतं. म्हणजे मी तिथे जाण्यापूर्वी एक आठवडा तरी ५ ते ६ किलोमीटर चढ चढत होते. पण तिकडे जाऊन वातावरण कधी बदलेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तिकडचं वातावरण फारच वेगळं आहे. असं म्हणत अभिनेत्रीचा तिचा अनुभव शेअर केला.

Comments
Add Comment

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची