अभिनेता वरुण धवनने पुणे मेट्रोतून केला प्रवास !

पुणे : बॉलीवुड अभिनेता वरुण धवन याने पुणे येथे ‘बॉर्डर २‘ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अहान शेट्टी सह पुणे मेट्रोतून प्रवास केला . त्यांचा पुणे मेट्रोतून प्रवास करताना एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे . यात मास्क लावून अभिनेता वरुण धवन आणि अहान शेट्टी पुणे मेट्रोमध्ये चढताना दिसत आहेत .


पुण्याच्या नागरिकांनी वरुण धवन आणि अहान शेट्टी यांना मेट्रो स्थानकावर पाहिल्यावर आश्चर्य आणि आनंद व्यक्त केला . प्रवासादरम्यान वरुणच्या अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी सुद्धा घेतली.  चाहत्यांनी या दोघांच्या या साधेपणाचे भरभरून कौतुक केले.



वरुण धवनने स्वतः तिकीट बुक केल्याचा आणि मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरून प्रवास केल्याचा व्हिडिओ अहान शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अहान शेट्टी, वरुण धवन दिसत आहे . वरुण धवन म्हणतो की, आम्ही सध्या पुण्यात आहोत. आम्ही हरवलो आहोत, तर आम्ही आता मेट्रोमधून प्रवास करीत हॉटेलपर्यंत जाणार आहोत. त्यानंतर ते पुण्याच्या मेट्रोमधून प्रवास करताना दिसत आहेत . त्यांनी यादरम्यान चेहर्‍यावर मास्क लावला आहे. त्यांनी काही वेळ गर्दीत उभे राहून प्रवास केल्याचे दिसत आहे.


‘बॉर्डर २‘ च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अभय शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग विविध राज्यांत होत आहे. सध्या पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये हे शूटिंग सुरू आहे . आता या सगळ्यात अभिनेता वरुण धवन व आहान शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे.


अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर २‘ मध्ये सनी देओल त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित भूमिकांपैकी एका भूमिकेत परत येत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबर २०२४ मध्ये सुरू झाले असून सध्या एनडीए येथे तिसऱ्या शेड्यूलचे चित्रीकरण सुरू आहे. या शेड्यूलमध्ये प्रमुख लष्करी दृश्ये चित्रित केली जाणार आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल . हा चित्रपट पुढील वर्षी २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे . हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या अगदी आधी २३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल . सुमारे दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला 'बॉर्डर'चा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता . आता त्याच्या दुसऱ्या पर्वाचे शूटिंग सुरू आहे .

Comments
Add Comment

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल; नेमके काय झाले ?

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत.

मन्नत मध्ये रूम मिळेल का? या प्रश्नावर शाहरुख खानचे "हे" मिश्किल उत्तर

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याने गुरुवारी ऑक्टोबर २०२५ रोजी त्याच्या ट्विटर पेजवर 'Ask SRK' सेशन ठेवत

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाची फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

मुंबई : मागील काही वर्षात मराठी चित्रपटांची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. नुकताच 'नाळ २' या सिनेमाला

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय