पंतप्रधान मोदी आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी फोनवरुन केली चर्चा

नवी दिल्ली : इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या लढाईत अमेरिका आणि येमेनमधील हुती अतिरेकी संघटना यांनी एकाच दिवशी उडी घेतली आहे. यामुळे युद्ध विस्तारण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या परस्थितीबाबत चर्चा केली. लष्करी संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली. तणाव त्वरेने कमी करण्यासाठी संवाद हाच उत्तम पर्याय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रादेशिक शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी लष्करी संघर्ष थांबणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला इराण कसा प्रतिसाद देणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात फोनवरुन ४५ मिनिटे चर्चा झाली. दोन्ही देशांनी एकमेकांमधील दृढ करण्याची परस्परांना हमी दिली. भारत हा प्रादेशिक शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी काम करणारा देश असल्याचे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले. तणाव करण्यासाठी भारताने सुचविलेल्या सल्ल्यांवर इराण गंभीरपणे विचार करेल, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले. त्यांनी तणावाच्या काळातही इराण सोबत राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी भारताची साथ महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

इस्रायल आणि इराण यांच्यात दहा दिवसांपासून लढाई सुरू आहे. अमेरिकेने इराणमध्ये निवडक ठिकाणी बॉम्ब टाकले. इराणची आण्विक शक्ती नष्ट करण्यासाठी ही कारवाई केल्याचे सांगत अमेरिकेने इस्रायलच्या इराण विरोधी कारवाईला पाठिंबा जाहीर केला. आवश्यकता भासल्यास इराण विरोधात आणखी कठोर कारवाई करू, असेही अमेरिकेने जाहीर केले. तर अमेरिका इराणवर हल्ला करणार असेल तर आम्ही अमेरिकेला धडा शिकवू, असा धमकीवजा इशारा येमेनेमधील हुती अतिरेकी संघटनेने दिला आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या लढाईत अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी आहे. पण अमेरिकेने केलेला हल्ला आणि त्यांचा इस्रायलला असलेला पाठिंबा म्हणजे इराण विरोधातील कारवाईच असल्याचे इराण सरकारने जाहीर केले. इस्रायलने १३ जून २०२५ रोजी आण्विक शक्ती नष्ट करण्याच्या उद्देशाने इराणवर हवाई हल्ले सुरू केले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने वेगवेगळ्या उंचीवरुन उडणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करुन इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला चकवून हल्ले सुरू केले आहेत.
Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: