ऑपरेशन सिंधू : आतापर्यंत ८२७ भारतीय मायदेशी परतले

परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल यांनी दिली माहिती


नवी दिल्ली : इरणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात येतेय. यातंर्गत आतापर्यंत 827 भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. उर्वरित लोकांना देखील आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करत दिली.

ऑपरेशन सिंधू अंतर्गत पहिल्या टप्प्यात इराणमधून 110 भारतीय विद्यार्थी सुरक्षितपणे मायदेशी परतले. या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने मायदेशी परत आणण्यात आले. त्यानंतर 20 जून रोजी 290 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले गेले. तर आज, शनिवारी 21 जून रोजी पहाटे 117 भारतीयांना घेऊन विशेष विमान डेरेदाखल झाले. तर दुपारी 4.30 वाजता इराणमधून 310 भारतीय नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत एक विमान दाखल झाले. यासह आतापर्यंत एकूण 827 भारतीयांना मायदेशी आणण्यात आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर