Tuesday, September 9, 2025

मानवंदना अरण्यऋषींना

मानवंदना अरण्यऋषींना
सृष्टीत रमला वृक्ष वल्लरीत सर्व काळ त्यांसी अभ्यासण्या l वनश्री व्यासंगी प्राणी पक्षी मित्र अरण्यची गोत्र सांगतसे l व्यक्ती फार थोर व्यग्र वनी फार ज्ञानाचा सागर अभ्यासक l बारीक सारीक तपशील ज्ञात फिरती वनात अनवाणी l पक्ष्यांचे कुजन घेतसे ऐकून भावार्थ सांगून तोषवितो l वन निरीक्षण हाची छंद फार जीवनाचे सार आरण्यसे l मान वंदना ही अर्पितो तुजला ज्ञान हे जगाला दिधले त्वा l ऋषित्व जीवन कल्याणा कारण वने तुजलागी आठविती

- प्रवीण पांडे, अकोला

Comments
Add Comment