विमानात किंवा हॉस्टेलमध्ये नसूनही चित्रपट निर्मात्याचा विमान अपघातात मृत्यू

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI 171 विमान अपघाताशी संबंधित एक नवी बातमी आली आहे. विमानात किंवा हॉस्टेलमध्ये नसूनही चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांचा विमान अपघातामुळेच मृत्यू झाला. डीएनए चाचणीअंती अहमदाबाद पोलिसांनी ही माहिती दिली.

ज्या दिवशी विमान अपघात झाला त्या दिवसापासूनच ३४ वर्षीय चित्रपट निर्माते महेश जिरावाला बेपत्ता होते. पोलीस जिरावाला यांना शोधत होते. चित्रपट निर्माते महेश जिरावाला दुचाकीवरुन घरी जाण्यासाठी निघाले होते, असे पोलिसांना कळले. यामुळे जिरावाला कोणत्या मार्गाने घरी जात होते याचा तपास करण्यात आला. या मार्गात विमान अपघाताचे ठिकाण असल्याचे लक्षात आले. चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांना शेवटचे बघणाऱ्यांनी दिलेली माहिती तसेच जिरावालांचा घरी जाण्याचा मार्ग यामुळे विमान अपघातात जिरावाला यांचा मृत्यू झाल्याची शंका पोलिसांच्या मनात आली. अखेर शंका निरसनासाठी डीएन चाचणी करण्याचा निर्णय झाला.

जिरावाला कुटुंबातील सदस्यांचे डीएनए आणि मृतांपैकी एका व्यक्तीचा डीएनए जुळला. डीएनए जुळले आणि महेश जिरावाला यांच्या मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. या फूटेजमध्ये विमान अपघात झाला त्या वेळी जिरावाल त्याच भागातून दुचाकीवरुन जाताना दिसले. अखेर दुचाकीवरुन जाताना जिरावाला हॉस्टेलच्या इमारतीजवळ होते जेव्हा अपघात झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला. आगीत जळून खाक झालेली जिरावालांची दुचाकी पोलिसांनी शोधली. यानंतर नातलगांनी चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांचा मृतदेह स्वीकारला.
Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,