सायलस्वार वारकऱ्यांचा पंढरीत रंगला नेत्रदीपक रिंगण सोहळा

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने भव्य दिव्य सायकल वारीचे आयोजन


पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने सायकलवारीचे आयोजन करण्यात येते, त्यानुसार यंदाच्या १३ व्या वर्षी पंढरीत भव्य दिव्य सायकलवारी रंगली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे 300 सदस्य यंदा या वारीत सहभागी झाले होते.


सायकलवारीचे हे तेरावे वर्ष असून, २२ जून रोजी अखंड महाराष्ट्रातील ९१ क्लबचे ४ हजार सायकलिस्ट पंढरपूर येथे जमले होते. सकाळी प्रभात फेरी काढून विठ्ठल मंदिराला सायकलवर नगरप्रदक्षिणा घालून सर्व सायकलिस्ट चा ताफा रेल्वे ग्राउंड वर रिंगण सोहळ्यासाठी सज्ज झाला. गेल्या तीन वर्षांपूर्वी नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनने अखंड महाराष्ट्रातील सायकलिस्टला पंढरपूर येथे एकाच दिवशी एकत्रित येण्यासाठी पुढाकार घेतला.



चार हजार सायकल वारकऱ्यांचा नेत्र दीपक रिंगण सोहळा


आज रविवारी चार हजार सायकल वारकऱ्यांचा नेत्र दीपक रिंगण सोहळा पंढरीत रंगला, जे पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. यंदाच्या वर्षी लातूर सायकलिस्ट क्लबने स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमाचे यजमानपत्र स्वीकारले. या रिंगण सोहळ्यासाठी अतिशय सुंदर असे नियोजन करण्यात आले होते. ग्राउंड वर रिंगणसाठी पांढऱ्या रांगोळीने वर्तुळे आखण्यात आली होती. आयोजकांच्या सूचनेनुसार शिस्तबद्ध पद्धतीने सायकलस्वार आपली सायकल उभी करून विठू नामाचा गजर करत, मोठ्या जल्लोषात रिंगणात सामील झाले. हा रिंगण सोहळा केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.



सायकल वारीबद्दल रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया


"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली फिट इंडिया मुव्हमेंट साठी सायकलिस्ट चे मोठे योगदान आहे.  या रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने आपणा सर्वांची भेट झाली, याबाबत मी स्वतःला खरोखर नशीबवान समजते" असे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन ग्रुप बरोबर दृष्टीहीन सायकलिस्ट सायकल चालवत टॅण्डम सायकलवर पंढरपूरला आले, ज्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे , आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धर्यशील मोहिते पाटील हे देखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


सायकल रिंगण सोहळ्यानंतर विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास समोरील प्रांगणात भव्य सभा मंडपात "चतुर्थ अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलन 2025 "पार पडले. या कार्यक्रमात सायकलिस्टला मार्गदर्शन करण्यासाठी भारतातील पहिले सोलो रॅम फिनिशर डॉ.अमित समर्थ हे नागपूर वरून ३२ तासात ६७५ की.मी. सायकल प्रवास करून सायकल संमेलनात पोहोचले. संमेलनाच्या उद्घाटनासाठी सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील हे उपस्थित होते. उपस्थित सर्व सायकलिस्टने पर्यावरण संवर्धनाविषयी शपथ घेतली. पंढरपूरचे परिचारक उमेश मालक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.



सायकल वारकऱ्यांनी सादर केले रंगीत कार्यक्रम, विशेष सन्मान 


अखिल महाराष्ट्र संमेलनचे उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी सायकल चळवळ व्यापक होण्यासाठी उपस्थित सायकलिस्टला मार्गदर्शन केले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. मनिषा रौंदळ यांनी महिला असून आत्तापर्यंत सलग 11 वेळा पंढरपूर सायकलवारी केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर एका पायाने सायकल चालविणारा दिव्यांग सायकलिस्ट सुनील पवार याला देखील सन्मानित करण्यात आले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या टीमने सायबर क्राईम या विषयावर प्रबोधनात्मक अतिशय छान पथनाट्य सादर केल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.


पंढरपूर सायकल वारी प्रॅक्टिस राईड चॅलेंजचे मेडल वितरण पंढरपूर संमेलनात करण्यात आले. यासाठी चंद्रकांत नाईक यांनी आणि रवींद्र दुसाने यांनी प्रचंड मेहनत घेतली. नाशिक ते पंढरपूर सायकल वारीत भा.ज.पा.चे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी हे हे पण सहभागी झाले होते.एन.सी.एफ.चे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार ,संचालक दीपक भोसले, पंकज कुमार पाटील, सुरेश डोंगरे व नितीन कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली छान पार पडली. वारी प्रमुख आय.पी.एस. संजय बारकुंड, माधुरी गडाख, प्रवीण कोकाटे, बजरंग कहाटे यांनी विशेष मेहनत केलेली. पांडुरंगाच्या कृपेने निर्विघ्नपणे ही वारी पार पडली.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

- आज विशेष न्यायालयात हजर होणार लातूर : देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी खळबळ! प्रा. मोटेगावकर पुन्हा सीबीआयच्या रडारवर?

देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाने (NEET Paper Leak Case) आता आणखी गंभीर वळण घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. लातूरमधील

Vidhanparishad Elections : विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

२२ जूनला मतमोजणी; स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर मुंबई : गेल्या अनेक

NEET Paper Leak Case : NEET निकालात ‘१८० पैकी १८०’चा दावा; नांदेडच्या क्लासवर CBIचा छापा

नांदेड : NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्रातील नांदेड शहर पुन्हा

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता