आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्याने एका व्यक्तीला चिरडले, व्हिडिओ आला समोर

गुंटूर: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या ताफ्यातील वाहनाने एका ५४ वर्षीय व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी येतुकुरुजवळ घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 


गुंटूर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ५४ वर्षीय व्यक्तीला चिरडले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे जनतेत संताप निर्माण झाला आहे. संबंधित घटनेची औपचारिक चौकशी सुरू झाली आहे.



मृत व्यक्ति वायएस आरसीपीचा समर्थक


सदर व्यक्तीचे नाव चिली सिंगय्या असे असून ते वेंगळयपालेम गावातील रहिवासी आणि वायएसआरसीपीचे समर्थक होते, जगन मोहन रेड्डी यांच्या सट्टेनापल्ली मंडळातील रेंटापल्ली गावाच्या भेटीदरम्यान ते  रस्त्याच्या कडेला उभे होते. रेड्डी तिथे एका पुतळ्याचे अनावरण करणार होते. सिंगय्या यांनी त्यावेळी रेड्डी यांना फुले वाहण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यादरम्यान त्यांची ताफ्याच्या वाहनासोबत टक्कर झाली. या टक्करमुळे ५४ वर्षीय सिंगय्या खाली पडले आणि वाहनाखाली आहे. ही भयानक घटना व्हिडिओ फुटेजमधून समोर आली आहे.   


 



 

व्हायरल व्हिडिओमध्ये सिंगय्या वाहनाखाली पडताना दिसत आहे, पण ताफा न थांबता पुढे जाताना दिसतो. गाडीची चाके अक्षरशः त्यांच्या मानेवरून जाताना या व्हिडिओमधून दिसून येते. या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले लोक ताबडतोब त्यांच्या मदतीला धावले आणि पोलिसांना याबद्दल माहिती देखील दिली. सिंगय्या यांना तातडीने गुंटूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.



पोलिस तपास आणि अधिकृत निवेदन


गुंटूरचे पोलिस अधीक्षक सतीश कुमार आणि गुंटूर रेंजचे आयजी सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. डेक्कन क्रॉनिकलशी बोलताना आयजी त्रिपाठी म्हणाले की "पीडिताचा अशा प्रकारे मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी आहे. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की ताफ्यात 30 ते 35 वाहने होती, तर फक्त तीन वाहनांना अधिकृत परवानगी होती." ते पुढे म्हणाले, "ताफ्यात सामील होणाऱ्या अनधिकृत वाहनांची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल."



कुटुंबाच्या मागण्या आणि सुरक्षेचे प्रश्न


सिंगय्याच्या कुटुंबाने या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेने राजकीय ताफ्याचे व्यवस्थापन आणि सुरक्षा नियमावलीमधील त्रुट्या उघडकीस आणल्या आहेत. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची अपेक्षा केल्या जात असून  करत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू