Dashawtar Marathi Movie: दिलीप प्रभावळकर एका गूढ अवतारात, १२ सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा एक नवा आणि गूढ अवतार लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' हा मराठी चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही एक भव्य गाथा असून ती कोकणच्या परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावली आहे.


दिलीप प्रभावळकरांचा ८० व्या वर्षी नवा आणि रहस्यमय अवतार
चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू अशा अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे दिलीप प्रभावळकर वयाच्या ८० व्या वर्षी एका पूर्णपणे वेगळ्या आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहेत. 'दशावतार'मधील त्यांची गूढ भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल आणि त्यांना एक चित्तथरारक अनुभव देईल असे म्हटले जात आहे.


कोकणात ५० दिवसांचे चित्रीकरण, सुबोध खानोलकर यांचे दिग्दर्शन
हा चित्रपट कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित आहे. कोकणातील नयनरम्य ठिकाणी सलग ५० दिवस चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना कोकणच्या भव्यतेचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेता येईल. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे.


सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे आहेत. लवकरच 'झी मराठी' वाहिनीवर या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळेल.


'दशावतार' हे एक भव्य आव्हान: दिलीप प्रभावळकर
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, "दशावतार चित्रपटात आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी, आव्हानात्मक आणि सगळ्यांना चकित करणारी भूमिका साकारायला मिळाली, याचा आनंद आहे. वयाची मर्यादा अभिनेत्यांना नसते, नवनवीन भूमिका आणि आव्हाने मला खुणावत असतात. याप्रमाणेच हे एक भव्य आव्हान आहे."


'दशावतार' हा कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार आहे, जो प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.