पंजाबमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली सैन्यातील एक जवान आणि त्याच्या साथीदाराला अटक!

अमृतसर: पंजाब पोलिसांनी रविवारी भारतीय लष्कराच्या एका जवानाला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. या दोघांवरही पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी संवेदनशील लष्करी माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.


पंजाब पोलिसांनी रविवारी भारतीय लष्करात असलेल्या एका जवानाला आणि त्याच्या साथीदाराला पाकिस्तानासाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पंजाबचे पोलिस महासंचालक (DGP ) गौरव यादव यांनी सांगितले की, अटक केलेल्या जवानाचे नाव गुरप्रीत सिंग असे आहे, जो जम्मूमध्ये भारतीय सैन्यात तैनात होता आणि तो पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील धारिवालचा रहिवासी आहे. त्याचा सहकारी साहिल मसीह देखील धारिवालचा रहिवासी आहे.



आयएसआय एजंट्सच्या थेट संपर्कात होते


डीजीपीच्या मते, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की गुरप्रीत सिंग आयएसआय एजंट्सच्या थेट संपर्कात होता आणि तो पेन ड्राइव्हद्वारे गोपनीय लष्करी माहिती शेअर करत असे. गुप्तचर माहितीच्या आधारे, दोन्ही आरोपींना संवेदनशील डेटा पुढे हस्तांतरण करण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली आहे.


व्हर्च्युअल नंबरचा केला जात होता वापर


डिजीपी गौरव यादव यांनी असेही सांगितले की, तपासादरम्यान, आयएसआयच्या मुख्य संपर्क सूत्राची ओळख राणा जावेद अशी झाली आहे. दोन्ही आरोपींकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत ज्यात व्हर्च्युअल नंबर पाकिस्तानी एजंटशी संपर्क साधण्यासाठी वापरले जात होते.



२०१६ मध्ये सैन्यात भरती 


अमृतसर ग्रामीण एसएसपी मनिंदर सिंग म्हणाले की, गुरप्रीत २०१६ मध्ये सैन्यात भरती झाला होता आणि त्याने लष्करी माहिती गोळा करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला.  पेन ड्राइव्ह आणि डिस्कद्वारे अनेक गोपनीय माहिती त्याने आयएसआयला पाठवली असल्याचा संशय आहे.  गुरप्रीत सतत संवेदनशील माहिती निश्चित ठिकाणी सोडत असे, जिथून आयएसआय एजंट ती उचलत असत. हेरगिरीच्या बदल्यात, गुरप्रीतला पैसे मिळत होते, जे परदेशात जोडलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे आणि नेटवर्कद्वारे पाठवले जात होते जेणेकरून त्याचा मागमूसदेखील लागू शकणार नव्हता. अधिकृत गुप्तता कायदा आणि भारतीय न्यायिक संहिता अंतर्गत अमृतसरच्या लोपोके पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे