Ajit Doval: ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पहिल्यांदाच चीनला जाणार

नवी दिल्ली: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. डिसेंबरनंतरचा डोवाल यांचा हा दुसरा चीन दौरा असेल. या भेटीतील त्यांचे उद्दिष्ट दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेणे आणि भारत-चीन संबंधांमधील तणाव कमी करणे हे असणार आहे. ही भेट सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेच्या तयारीचा एक भाग आहे.


सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर आहे. यादरम्यान, अजित डोवाल यांची ही भेट अधिक महत्त्वाची मानली जात आहे. इराणचे एनएसए या बैठकीला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु डोवाल चीन, रशिया आणि इतर एससीओ सदस्य देशांच्या सुरक्षा सल्लागारांशी नक्कीच चर्चा करतील.

सर्वांच्या नजरा या गोष्टीकडे लागून आहेत की डोवाल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेणार का नाहीत. वांग यी हे चीनचे विशेष प्रतिनिधी देखील आहेत. ही भेट भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि चीनकडून पाकिस्तानला लष्करी पाठबळ दिल्या जात असलेल्या वातावरणात होणार आहे.

दहशतवादाबद्दल अजित डोवाल यांचे स्पष्ट मत


मीडिया रिपोर्टनुसार, अजित डोवाल यांचा हा चीन दौरा शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेच्या तयारीचा एक भाग आहे. ही शिखर परिषद सप्टेंबरच्या सुरुवातीला चीनमध्ये होणार आहे. डोवाल या दौऱ्यात चीन आणि रशियातील त्यांच्या समकक्षांशी भेट घेणार आहेत. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या दौऱ्यात अजित डोवाल दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याचा संदेश देतील. तसेच दहशतवाद्यांना मिळणाऱ्या मदतीला रोखण्याबाबतही ते चर्चा करण्याची शक्यता आहे.



भारत-चीन विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावर चर्चा  


याशिवाय या दौऱ्यात भारत आणि चीन दरम्यान थांबवण्यात आलेल्या थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनने भारताशी थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने चीनला कडक संदेश दिला होता. हा संदेश सीमापार दहशतवाद आणि पाकिस्तानच्या भूमिकेबाबत होता.


Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी