Mumbai Crime: संतापजनक! जोगेश्वरीत १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाने बनवला व्हिडिओ

प्रेयसीच्या 10 वर्षीय मुलीवर वारंवार केला अत्याचार, गाठला क्रूरतेचा कळस


Mumbai Crime: मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधमाने व्हिडिओ शूट केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेने मुंबई पुन्हा हादरली आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.


प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत क्रूरतेची हद्द नराधमाने पार केली. ही चिमुकली अवघ्या १० वर्षांची आहे.



नेमके काय घडले?


जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी परिसरात आपली २१ वर्षीय प्रेयसी कामावर गेल्यावर तिच्या १० वर्षांच्या मुलीवर २४ वर्षीय तरुणाने वारंवार अत्याचार केला. अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत या संपूर्ण कृत्याचा व्हिडीओ नराधमाने शुट केला. त्यानंतर पुन्हा मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. हा प्रकार मुलीच्या आईला कळल्यानंतर आरोपी प्रियकराने महिलेवरही टोकदार वस्तूने हल्ला केला. जर कोणाला या प्रकाराची माहिती दिली तर काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी नराधमानं दिली.


या घटनेनंतर हिंमत करत महिलेने मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मेघवाडी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत 24 वर्षीय तरुणाला आणि त्याच्या प्रेयसीला म्हणजेच पीडित अल्पवयीन मुलीच्या आईलाही अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास मेघवाडी पोलीस करत आहेत.


राज्यभरात महिला अत्याचार, लैंगिक छळाच्या धक्कादायक घटना समोर येत आहे. यापूर्वी घाटकोपरमध्ये देखील एका महिला वैमानिकावर कॅब चालकाद्वारे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेला. या संबंधित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेला २४ तास होत नाही तर जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकरांकडून वारंवार झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १० हजार ३०० मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी विधानसभेतील मतदार केंद्राप्रमाणेच केंद्र

'मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करू'

मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे)