Tata IPO ब्रेकिंग न्यूज: Tata Capital १७२०० क़ोटींचा ऐतिहासिक आयपीओ बाजारात दाखल करणार !

  149

प्रतिनिधी: टाटा कॅपिटलने बाजारात आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे केलेल्या अर्जाला सेबीने मान्यता दिली आहे.अशी खात्रीलायक वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. टाटा सन्सची उपकंपनी (Subsidiary) टाटा कॅपिटल (Tata Capital) आपला आयपीओ बाजारात लवकरच आणू शकतो. सेबीकडे पाठवलेल्या DHRP ला मान्यता मिळाल्याने टाटा कॅपिटलचा १७२०० कोटीचा आयपीओ (IPO) दाखल होऊ शकतो. DHRP (Draft Red Herring Prospectus) हा आयपी ओ दाखल करण्यासाठी दिलेला अर्ज असतो ज्यामध्ये कंपनीच्या आयपीओ अर्जातील सगळी इत्यंभूत माहिती असते. तो मान्य झाल्यानंतर ते कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जाते.असे असताना सेबीने दिलेल्या DHRP मान्यतेनुसार आता कंपनी आपला अंतिम मसुदा Red Herring Prospectus RHP) माध्यमातून आणू शकते.


टाटा कॅपिटल या एनबीएफसी (विना बँक वित्तीय संस्था NBFC) कंपनीचा आयपीओ बाजारातील सर्वोच्च मोठ्या आयपीओपैकी एक असणार आहे. टाटा आयपीओत फ्रेश इश्यू (Fresh Issue) व ऑफर फॉर सेल (OFS) दोन्हीचा समावेश असणार आहे. एप्रिल महिन्याच्या पाच तारखेला या कंपनीचा आयपीओ फाईल करण्यात आला होता. या कंपनीत टाटांचे ९३% भागभांडवल (Stake) आहे.


यापूर्वी आरबीआयने टाटा सन्स व टाटा कॅपिटल या दोन्ही कंपन्याना अप्पर लेअर एनबीएफसी (Upper Layer NBFC) म्हणून २०२५ सप्टेंबरपर्यंत सूचीबद्ध होण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आ हे. कंपनीकडून या विषयी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या टाटा कॅपिटल ही असूचीबद्ध (Unlisted) असल्याने ग्रे बाजारात हे शेअर्स १३.५०% वाढले असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मार्च महिन्यात कंपनीला एकत्रि त (Consolidated) नफा ३१% वाढत १००० कोटींपर्यंत पोहोचला होता. दरम्यान या आयपीओ संबंधीची अधिक माहिती अजून समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

प्रधानमंत्री जन धन योजनेत महिलांची ५६ टक्के भागीदारी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजनेला गुरुवारी ११ वर्ष पूर्ण झाली. ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली

शिगवे बहुला येथे पॅराशूट कोसळले

भगूर : नाशिक जवळील शिंगवे बहुला गावातील घरावर लष्कराचे पॅराशुट ( ग्लायडर ) कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवित

'राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला'

नवी दिल्ली : राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला. हम दो हमारे तीन, हे धोरण राष्ट्रीय हितासाठी अवलंबिले

नवे सहकार धोरण देशात परिवर्तन घडवेल!

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला भारत देश वेगाने प्रगती करतं आहे. समाजातील सर्व घटकांचा

'राज को राज रहने दो' असं का म्हणाले एकनाथ शिंदे ?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन