Raja Raghuvanshi Murder Case: सोनम आणि तिच्या प्रियकराला १३ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी

शिलाँग: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात (Raja Raghuvanshi Murder Case) शिलाँग न्यायालयाने शनिवारी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) आणि तिचा प्रियकर राज कुशवाह (Raj Kushwah) यांना १३ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोनम आणि राज हे राजा रघुवंशीच्या हत्येतील मुख्य आरोपी आहेत. या दोघांवर आता न्यायालयीन कारवाई करण्यात येत असून, आज झालेल्या सुनावणीत या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


हनिमूनच्या नावाखाली मेघालय येथे येऊन सोनम रघुवंशी हिने आपला प्रियकर आणि तीन किलर कॉंट्रॅक्टरसह पती राजा रघुवंशीची निर्घुण हत्या केली. या खळबळजनक हत्या प्रकरणात सोनं आणि राज बरोबरच आणखी तीन आरोपी आकाश, विशाल आणि आनंद यांनादेखील यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावरदेखील  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक सरकारी वकील तुषार चंदा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी कोठडी मागितली नाही. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यानुसार न्यायालयाने १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.'



कुटुंबाने सोनमची सखोल चौकशी करण्याची मागणी केली


राजा रघुवंशीचा मोठा भाऊ सचिन रघुवंशीने सोनमवर तिच्या सुरुवातीच्या आठ दिवसांच्या कोठडीत पोलिस तपासकर्त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. या हत्येच्या कटाची संपूर्ण व्याप्ती उघड करण्यासाठी त्याने पोलिस कोठडी वाढवावी आणि आणखीन सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. सोनमने महत्त्वाचे तपशील लपवले असल्याचा आरोप करत अधिक सखोल चौकशीसाठी सर्व आरोपींना इंदूरला हलवण्याची मागणी त्यांनी केली होती. 



सोनमचे कुटुंबीय आणि हत्याकांड संबंधित सर्व आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी


सचिन रघुवंशी यांनी सोनमच्या कुटुंबाची आणि जवळच्या सहकाऱ्यांची नार्को चाचणी करण्याची मागणी देखील केली, त्यांनी आरोप केला की ते देखील या कटात सहभागी असू शकतात. सचिन रघुवंशी यांच्या मते, एवढा मोठा कट एकट्याने रचणे सोपे नाही. त्याच्या जवळच्या लोकांची सखोल चौकशी केली पाहिजे.



एक हनिमून जो जीवघेणा ठरला


इंदूर येथील वाहतूक व्यवसायिक राजा रघुवंशी यांनी ११ मे रोजी सोनम रघुवंशी लग्न केले. २० मे रोजी हे जोडपे हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. २३ मे रोजी राजा बेपत्ता झाला आणि २ जून रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा (चेरापुंजी) येथील धबधब्याजवळील खोल दरीत त्याचा कुजलेला मृतदेह आढळला. यानंतर बेपत्ता सोनमचा शोध सुरू झाला. दरम्यान, मिळत गेलेल्या काही पुराव्याच्या आधारे सोनमनेच आपल्या पतीची हत्या केल्याचा संशय तपासकर्त्यांना येऊ लागला. त्यानंतरव सोनमने ८ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तिचा प्रियकर राज कुशवाह, त्याचे साथीदार विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांना मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली.

Comments
Add Comment

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा