Sindhudurg Accident News: देवगडमध्ये एसटीचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू,

  152

Sindhudurg Accident News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे गावात रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. तर मृत व्यक्तीमध्ये संकेत घाडी, संतोष गावकर, रोहन नाईक आणि सोनू कोळंबकर या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर


दरम्यान, या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांभुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली, ज्यामुळे रिक्षातील प्रवाशांचे प्राण गमवावे लागले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूढील कारवाई सध्या केली जात आहे. मात्र या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी मध्य धुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतलं. तसंच पुढील तपासणी सुरू केली आहे.
Comments
Add Comment

जरांगेंच्या नेतृत्वात हजारो समर्थक मुंबईत धडकणार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह हजारो समर्थकांचे मोर्चा उद्या, शुक्रवारी मुंबईत

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

प्रधानमंत्री जन धन योजनेत महिलांची ५६ टक्के भागीदारी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजनेला गुरुवारी ११ वर्ष पूर्ण झाली. ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली

'राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला'

नवी दिल्ली : राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला. हम दो हमारे तीन, हे धोरण राष्ट्रीय हितासाठी अवलंबिले

नवे सहकार धोरण देशात परिवर्तन घडवेल!

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला भारत देश वेगाने प्रगती करतं आहे. समाजातील सर्व घटकांचा

'राज को राज रहने दो' असं का म्हणाले एकनाथ शिंदे ?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन