RBI मोठी बातमी - २०२४ नंतर परकीय चलनसाठ्यात भारताचा नवा उच्चांक! 'इतके' अब्ज डॉलर्स तिजोरीत जमा

मुंबई: एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा परकीय चलन साठ्यात (Forex) १३ जूनपर्यंत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. जून १३ पर्यंतच्या आठवड्यात भारताला ६९८.९५० अब्ज डॉलर्सचा चल नसाठा मिळाला आहे. सप्टेंबर २०२४ नंतर वाढलेला हा सर्वांत मोठा चलन साठा आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२४ पर्यंत परकीय चलन साठा तब्बल ७०४.८९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.यापूर्वी नुकत्याच झालेल्या वित्तीय पतधोरण समितीचा नि काल जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कपात केली होती.५० बेसिस पूर्णांकाने ही कपात केल्याने रेपो दर (Repo Rate) ६ टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांवर आला होता.हे जाहीर करतानाच मल्होत्रा यांनी भा रताकडे ११ महिने सहज पुरेल इतका मुबलक परकीय चलनसाठा आहे‌ जो परदेशी देणी व आयातीचे पैसे सहज चुकते करू शकतो असे म्हटले होते.

आरबीआयच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सध्या भारताचा सोने चलनसाठा ८६.३१६ अब्ज डॉलर्स आहे. त्यापैकी Foreign Currency Assets FCA) हा हिस्सा ५८९.४२६ अब्ज डॉलर होता. जगभरात सोन्याच्या गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणा त वाढ होत आहे.अनेक राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँका (Central Apex Bank) सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ करत असताना भारतानेही हा पवित्रा घेतला होता. परकीय चलनसाठा आर्थिक वर्ष २०२३ मधील ५८ अब्ज डॉलरवरून वाढत आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ७८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

देशाची सर्वोच्च बँक आरबीआय व इतर देशांच्या सेंट्रल बँका आपल्या देशाचा चलनसाठा नियंत्रित करतात. भारताची दैनंदिन स्थितीत अर्थव्यवस्थेतील हालचाली, जमापुंजी, जमाखर्च पाहत त्याचा साठा नियंत्रित वेळोवेळी आरबीआय करत असते. देशाच्या अर्थव्यवस्थेतील तरलता (Liquidity),व रूपयांचे परकीय चलनाच्या देवाणघेवाणीतील मूल्य यावर बारकाईने लक्ष देत आरबीआय चलनाविषयी वेळोवेळी निर्णय घेत असते.
Comments
Add Comment

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना