Oben Electric : ओबेन इलेक्ट्रिकने १०० कोटींचा सीरीज ए फंडिंग राउंड पूर्ण केला !

मुंबई: ओबेन इलेक्ट्रिक या एका संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्वदेशी इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी, ने मे २०२५ मध्ये विस्तारित सीरीज ए फंडिंग (Series A Funding) राउंडमध्ये अतिरिक्त ५० कोटी रूपये उभारले आहेत. हा विस्तारित सीरीज ए राउंड जानेवारी २०२५ मध्ये ५० कोटींच्या सीरीज ए राउंडनंतर आला आहे.ज्यामुळे एकूण सीरीज ए फंडिंग १०० कोटी रुपये व एकूण उभारलेला निधी आता २०० कोटी रुपये झाला आहे.या निधी उभारणीमध्ये हेलिओस होल्डिंग्स,शारदा फॅमिली ऑफिस, कै फॅमिली यांच्यासह इतर नवीन आणि सध्याच्या गुंतवणूकदारांनी भाग घेतला. हे महत्त्वपूर्ण फंडिंग ओबेन इलेक्ट्रिकच्या सातत्यपूर्ण वाढीवर, उत्कृष्ट उत्पादन गुणवत्तेवर, मजबूत आर्थिक मेट्रिक्सवर आणि इलेक्ट्रिक मोटरसायकल क्षेत्रातील तिच्या नेतृत्वावर गुंतवणूकदारांचा दृढ विश्वास दर्शवते असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.

ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधुमिता अग्रवाल यांनी सांगितले, ' विस्तारित सिरीज ए फंडिंग आमच्या गुंतवणूकदारांचा आमच्यावरील दृढ विश्वास दर्शवतो आणि हे अशा वेळी आले आहे, जेव्हा देशभरात आमची प्रगती वेगाने होत आहे. आम्ही केवळ आमचा किरकोळ व्यवसाय वाढवत नाही, तर ओ१०० सारख्या प्लॅटफॉर्मसह आमच्या नवनवीन उपक्रमांचाही विस्तार करत आहोत. याचे उद्दिष्ट मोठ्या बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक मोटरसायकल ला अधिक परवडणारे बनवणे आहे. पूर्ण उभ्या एकत्रीकरण आणि लवचिक पुरवठा साखळीच्या पाठिंब्याने, हे फंडिंग आम्हाला वाढ, प्रभाव आणि संधींच्या नवीन टप्प्यासाठी तयार करते.'

या नवीनतम निधी प्रवाहामुळे ओबेन इलेक्ट्रिकची सतत वाढ शक्तिमान होईल आणि आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत ५० हून अधिक शहरांमध्ये १५० हून अधिक शोरूमच्या विस्तारास गती मिळेल, १ लाखाखाली परवडणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसाय कलसाठी कंपनीच्या नवीन 'ओ१००' प्लॅटफॉर्मच्या उत्पादन विकासास वेग मिळेल,आणि बेंगळुरू सुविधेत उत्पादन वाढवून बाजारांमध्ये विक्रीनंतरच्या सेवा नेटवर्कला बळकटी मिळेल असे कंपनीने म्हटले आहे.दरम्यान, प्रारंभिक सीरीज ए फंडिंगनंतर, ओबेन इलेक्ट्रिकने पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा यांसारख्या मुख्य बाजारांमध्ये प्रवेश करून १३ राज्यांमध्ये २६ शहरांमध्ये ३७ किरकोळ दुकाने असलेल्या जलद विस्तारासह मजबूत फंडिंगनंतरची अंमलबजावणी आणि मागणी दर्शवली जात आहे असे दावा कंपनीने याप्रसंगी केला आहे.
Comments
Add Comment

हिवाळी बचतीचे 'भांडार' बीकेसीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

विजय सेल्‍सच्या आयआयसीएफ कंझ्युमर एक्‍स्‍पोमध्ये १०० हून अधिक टॉप ब्रँड्सची उत्पादने उपलब्ध मुंबई: धमाकेदार

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

Top Stock Picks Today: मोतीलाल ओसवालकडून 'या' २ शेअरला खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळणार?

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर खरेदीसाठी सूचवले आहेत. आजचे टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या कुठले

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

महाडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपने रचला इतिहास

फटाके फोडून, गुलाल उधळण्याची संधी तिघांनाही महाड निवडणूक चित्र संजय भुवड महाड : नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक