मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले; सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढा तलावांमध्ये पाणीसाठा

  59

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठी झाल्याने पाणी कपातीचे संकट टळले आहे. जमा झालेले पाणी मुंबईला पुढील ९५ दिवसांसाठी म्हणजेच सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढे आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.


मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी जमा होणे गरजेचे असते. या साठ्यानुसार मुंबईच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते.


वर्षभर लागणारे पाणी जमा होण्यासाठी जूनपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होणे गरजेचे असते. मात्र, या वर्षी मेअखेर सुरू झालेल्या पावसाने सुरुवातीचा काही काळ धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने जलसाठा १० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आले होते. मात्र जूनमध्ये गेल्या दोन आठवड्यांत बरसलेल्या मान्सूनने कसर भरून काढली. सध्या या धरणांमध्ये २५ टक्के पाणी जमा झाले आहे. यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे मुंबईवरील पाणीसंकट टळले आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही