खचलेल्या रस्त्याचे काम नियमानुसार नसल्याचे मनपाला एमएमआरडीएचे पत्र

  43

भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक भागातील रस्ता खचून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेऊनही महापालिकेने दुर्लक्षित केल्यावर त्या रस्त्याचे बिल्डरने हाती घेतलेले दुरुस्तीचे काम एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी पाहणी केल्यावर नियमानुसार होत नसल्याचे आढळून आल्याचे पत्र महापालिकेला दिले आहे.


भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक भागातील तपोवन शाळे जवळच्या सीसी रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएकडून करण्यात आले होते. याच रस्त्यालगत आरएनए बिल्डरच्या गृहप्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले, या इमारतीच्या पोडियमसाठी खोदकाम करताना बिल्डरने रस्त्याखालील जमीन खचणार नाही, यासाठी कोणतीही खबरदारी घेतली नाही. परिणामी १७ मे रोजी या रस्त्याखालची जमीन खचल्याची घटना घडली होती. एमएमआरडीएने त्या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी बिल्डरवर निश्चित केली होती. तसे पत्र एमएमआरडीएने पालिकेला १९ मे रोजी पाठविले. यानंतरही बिल्डरने त्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली नाही. अलिकडेच बिल्डरने रस्त्याच्च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी ते नियमानुसार केले जात नसल्याचे एमएमआरडीएच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या कामाचा आढावा घेत पालिकेला ११ जून रोजी पत्र पाठवून त्या रस्त्याची होत असलेली दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असून भविष्यात होणाऱ्या नुकसानीला बिल्डरच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बिल्डरने त्याच्या जागेत खोदकाम करताना कोणतीही सुरक्षा वा उपाययोजना केली नसल्यानेच निष्काळजीपणामुळे रस्त्याखालची जमीन खचल्याचे एमएमआरडीएने या पत्रात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.

'जय जवान'ची १० थरांची हॅट्रिक! लागोपाठ तीन ठिकाणी केला विक्रम

प्रथम घाटकोपर, आणि ठाण्यात दोनडा असे सलग तीनवेळा १० थर रचत केला महाविश्वविक्रम ठाणे: जोगेश्वरीच्या जय जवान

ठाण्यात या गोविंदा पथकाने लावले १० थर, टाळ्यांच्या कडकडाटात झाले कौतुक

ठाणे : मुंबई ठाण्यासह सर्वत्र दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. गोविंदा पथके दहीहंडी

मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी, किंग्ज सर्कल, अंधेरी, दादर तुंबलं, पोलिसांचा अलर्ट

मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली असून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. एकीकडे मुंबईसह

जखमी गोविंदांसाठी सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष

ठाणे : दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजार होत असला तरी उंच थरावरून पडून अनेक गोविंदांचे बळी जातात. सणाला गालबोट

ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या

डोंबिवली (प्रतिनिधी) : दहीहंडीची पंढरी ही ठाणे जिल्ह्याची ओळख जागतिक पातळीवर प्रसिद्धीस