ठाण्यातील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच!

ओपीडी, वॉर्ड सेवा, निवडक शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम बंद


ठाणे  : साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे प्रकरणी ठाण्यातील राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील निवासी डॉक्टरांनी मंगळवारपासून संप सुरू केला आहे. हा संप सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टरतर्फे
डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी आणि राज्यातील निवासी डॉक्टरांवरील वाढत्या अन्यायाविरोधात सुरू करण्यात आला आहे. या संपादरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्या तरी ओपीडी, वॉर्ड सेवा, निवडक शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम बंद ठेवण्यात आले आहेत.


साताऱ्यातील डॉ. संपदा यांनी आत्महत्येपूर्वी हस्तलिखित सुसाईड नोट लिहिली, ज्यामध्ये एका पोलीस अधिकारी आणि त्यांच्या भाडेकरूच्या मुलाकडून गंभीर छळ होत असल्याचा आरोप केला होता. या घटनेपासून डॉक्टर दररोज मेणबत्ती पेटवून आणि काळ्या फिती बांधून डॉ. संपदा आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आपला संताप व्यक्त करीत आहेत. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) आणि पालिका मार्ड यांनी अनिश्चित काळासाठी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये मंगळवार, ४ नोव्हेंबरपासून ठाण्यातील राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील निवासी डॉक्टरही सहभागी झाले आहेत. या संपादरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत, मात्र, ओपीडी, वॉर्ड सेवा, निवडक शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. यावेळी निवासी डॉक्टरांनी डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आणि प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, राज्यातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेची, सन्मानाची आणि अधिकारांची खात्री शासनाने द्यावी त्याचबरोबर प्रशासनिक पारदर्शकता, जबाबदारी आणि मानसिक आरोग्य सहाय्य यांचा समावेश असलेली प्रणालीगत सुधारणा राबवाव्यात, अशा मागण्या केलेल्या आहेत.


न्याय लांबवणे म्हणजे न्याय नाकारणे


अनेकदा शासन आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडे निवेदन दिल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्याने डॉक्टरांनी अखेर हा कठोर निर्णय घेतला आहे. संपामुळे राज्यभरातील वैद्यकीय सेवा बाधित होण्याची शक्यता असून, रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. डॉक्टरांनी मात्र ‘न्याय लांबवणे म्हणजे न्याय नाकारणे आहे’, या भावनेने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती संपावरील डॉक्टरांनी केली आहे.

Comments
Add Comment

ब्रिटिश कंपनी मिनीकडून ऑल इलेक्ट्रिक कंट्रिमन एस ई ऑल ४ कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतात लॉन्च

प्रतिनिधी: ब्रिटिश ऑटोमोटिव्ह ब्रँड मिनी (MINI) कंपनीकडून भारतात ऑल-इलेक्ट्रिक कंट्रीमन SE All4 ही चारचाकी लाँच केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'गुड गव्हर्नन्स' साध्य करण्यासाठी वाणिज्य विभाग कामाला ! युद्धपातळीवर कार्यक्षमता आणि स्वच्छ प्रशासनासाठी विशेष मोहीम ५.० पार

प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्दिष्टानुसार सरकारी विभागांच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी सरकारी

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Lumax Q2RESULTS: Lumax Industries कंपनीचा निकाल जाहीर! कंपनीच्या करोत्तर नफ्यात १६% वाढ तर मार्जिनमध्येही सुधारणा

मोहित सोमण:लुमॅक्स इंडस्ट्रीज (Lumax Industries) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) करोत्तर

मेट्रोंना विविध सेवा देणारी आता एकच कंपनी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्राधिकरण आणि कंपन्यांचे मेट्रो प्रकल्पांचे एकत्रिकरण

कृषी समृद्धी योजनेस राज्य सरकारची मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) : "कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय