Maharashtra Police Constable : बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखवून मिळवली नोकरी, पोलिस शिपाई बडतर्फ...

मुंबई : राज्य सरकारने गृहविभागाअंतर्गत  २०२१ मध्ये ५३० पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती.  राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार प्रकल्पग्रस्तांसाठी २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पोलिस खात्यात नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने राखीव गटात बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवली, त्यामुळे पोलिस शिपायाला खात्यातून बडतर्फ करण्यात आले.  सदरचा पोलिस शिपाई २०२१ मध्ये पोलीस दलात भरती झाला होता. भरती प्रक्रिया दरम्यान कागदपत्रांमध्ये प्रमाणपत्र नसल्याचे माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिस शिपायाला दिली होती.


संबंधित पोलिस शिपायाने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र उशिरा सादर केल्यामुळे बोगस प्रमाणपत्र असल्याची बाब त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नव्हती, परंतू  कागदपत्रांची पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर बोगस प्रमाणपत्र असल्याची धक्कादायक बाब समोर आली. सदरचा पोलिस शिपाई मुंबईतील नायगाव येथील शस्त्रास्त्र विभागात कार्यरत आहे.


नायगाव मुख्य विभागातली उपआयुक्त शेख यांनी संबंथित पोलिस शिपायाला कामावरुन काढून टाकले आहे.  पोलिस खात्याअंतर्गत पोलिस शिपायावर गेला वर्षी गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील जिल्हाअधिकारी कार्यालयात चौकशी केल्यानंतर प्रमाणपत्राची कार्यालयात नोंद नसल्याचे निष्पन्न झाले.


 

 

 

 

 
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती